Pandharpur

महाराष्ट्र शासनास सद्बुद्धी देऊन परीट धोबी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटावा यासाठी विठ्ठलाला साकडे

महाराष्ट्र शासनास सद्बुद्धी देऊन परीट धोबी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटावा यासाठी विठ्ठलाला साकडे

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : महाराष्ट्र परीट धोबी समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न खुप दिवसांपासुन प्रलंबित आहे तो लवकरात लवकर सुटावा यासाठी आज महाराष्ट्र प्रदेश परीट धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष मा श्री राजेन्द्र खैरनार, महाराष्ट्र प्रदेश परीट धोबी महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष मा सौ सुषमा ताई अमृतकर, कायदेशीर सल्लागार मा श्री सुधीर खैरनार, पश्चिम महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे अध्यक्ष मा श्री संजय मामा घोडके, अकोला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ विद्या ताई सरशे, युवक जिल्हाध्यक्ष मा श्री जयप्रकाश (राजु) ननवरे यांनी आज नामदेव पायरी चे दर्शन घेऊन महाराष्ट्र शासनास सद्बुद्धी देऊन परीट धोबी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा म्हणून साकडे घातले.बार्शी येथे परीट धोबी सेवा मंडळाची राज्य कार्यकारिणी मिटींग संपन्न यासाठी प्रदेशाध्यक्ष मा श्री राजेन्द्र खैरनार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी नवीन पदाधिकारी यांच्या नेमणुका करण्यात आल्या.
दुसऱ्या दिवशी कोरोना ने मयत झालेल्या समाज बांधवांची खैरनार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ आपल्या पाठीशी खंबीर उभे राहिल असं आश्वासन दिले.
शेवटी अख्या महाराष्ट्र चे दैवत विठ्ठल रूक्मिणी चे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे त्यामुळे नामदेव पायरी चे दर्शन घेऊन महाराष्ट्र शासनास सद्बुद्धी मिळावी म्हणून साकडं घातलं.
यावेळी परीट धोबी सेवा मंडळाचे जिल्हा सचिव दत्तात्रय क्षिरसागर, पंढरपूर तालुका अध्यक्ष गणेश दादा ननवरे, युवक शहर अध्यक्ष मा चि रामेश्वर सांळुखे, माजी तालुकाध्यक्ष वैभव ननवरे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button