Amalner

इंधवे येथील सरपंचावर प्राणघात हल्ला करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह 5 जणांना 5 वर्षाची शिक्षा

इंधवे येथील सरपंचावर प्राणघात हल्ला करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह 5 जणांना 5 वर्षाची शिक्षा

रजनीकांत पाटील

अमळनेर : पारोळा तालुक्यातील इंधवे येथिल सरपंचावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून 22 फ्रॅक्चर करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह 5 जणांना अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

पारोळा तालुक्यातील इंधवे येथे 30 जानेवारी 18 रोजी रात्री 10 वाजता छोटा मारुती मंदिराजवळ मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक असलेले हरिशचंद्र माधवराव पाटील योगेश माधवराव पाटील , शरद विश्वास पाटील , दीपक अधिकराव पाटील , दीपक हिम्मतराव पाटील आणि इतर 10 जणांनी इंधवे येथील तत्कालीन सरपंच जितेंद्र गुलाबराव पाटील यांच्यावर हल्ला चढवला हरिश्चंद्र याने कुऱ्हाडीने डोक्यावर मारून लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जितेंद्र ची पत्नी छायाबाई त्याला आवरण्यासाठी त्याच्या अंगावर पडली तिलाही आरोपीनी मारहाण केली तेव्हढ्यात जितेंद्र बेशुद्ध पडला होता त्यावेळी आरोपीनी त्याला शेवटची श्रद्धांजली देखील वाहिली जितेंद्र ला धुळे येथील सेवा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते त्याला 22 ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते 18 दिवसांनंतर जितेंद्र दवाखाण्यातून आल्यावर साक्षीदारणच्या मदतीने पारोळा पोलिसात जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी आरोपी हरिषचन्द्र फरार झाला होता त्याचा जमीन सर्वोच्च न्यायालयात देखील फेटाळल्यानन्तर 5 जून 18 रोजी त्याला अटक करण्यात आली होती. हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता सरकारी वकील किशोर बागुल यांनी फिर्यादीकडून 14 आणि आरोपिकडून 2 असे 16 साक्षीदार तपासले त्यात पत्नी छायाबाई , आई आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घनश्याम पाटील , मधुकर पाटील यांची व सेवा हॉस्पिटल मधील 5 डॉक्टरांची साक्ष ग्राह्य धरून न्या व्ही आर जोशी यांनी आरोपी हरिषचन्द्र पाटील , योगेश पाटील , शरद पाटील , दीपक अधिकार पाटील व दीपक हिम्मतराव पाटील यांना कलम 307 प्रमाणे 5 वर्षाची शिक्षा व 5 हजार रुपये दंड , दंड न भरल्यास 6 महिने शिक्षा , कलम 326 प्रमाणे 5 वर्षे शिक्षा , 5 हजार रुपये दंड , दंड न भरल्यास 6 महिने शिक्षा व 148 प्रमाणे 1 वर्षाची शिक्षा सुनावली इतर 10 आरोपीना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले
तसेच त्याचवेळी हरिश्चंद्र याने जितेंद्र गुलाबराव व इतर 6 जंनवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता दोन्ही खटले एकाचवेळी सुरू होते न्यायालयाने त्यात 6 जणांना निर्दोष मुक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button