Ahamdanagar

?Crime Diary…पो. निरीक्षक विकास वाघ याच्या वर लैंगिक छळ प्रकरणी नगर मध्ये गुन्हा दाखल

? Crime Diary..पो निरीक्षक विकास वाघ वर लैंगिक छळ प्रकरणी नगर मध्ये गुन्हा दाखल

अमळनेर, चोपडा येथे होते पो निरीक्षक म्हणून कार्यरत

अहमदनगर सुनील नजन

अहमदनगर येथे पो निरीक्षक विकास वाघ याच्यावर महिलेचा लैंगिक छळ व अत्याचार केल्या प्रकरणी नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची सविस्तर माहिती अशी की कोतवाली पोलीस ठाण्यात पो निरीक्षक म्हणून कार्यरत असताना न्याय मागणेसाठी गेलेल्या महिलेस कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याने या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले होते. वाघ याने लग्नाचे अमिश दाखवून पीडित महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला .यातून निर्माण झालेल्या गर्भधारणा वरही आक्षेप घेत जबरदस्ती गर्भपात केल्याची फिर्याद नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान लॉकडाऊन सुरू असताना ही फिर्यादी महिला थेट अमळनेर येथे देखील आली होती.अमळनेर येथे विकास वाघ याच्याशी संबंधित एका महिलेला मारहाण केली होती. अमळनेरला मारहाण झालेल्या त्या दुसऱ्या एका महिलेने मागील महिन्यात राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेने देखील वाघ याच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या. तक्रारींची चौकशी चालू असताना त्या महिलेने आत्महत्या केली होती .आणि आता नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच विकास वाघ सरकारी विश्राम गृहामधून फरार झाला आहे. या घटने मुळे महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी झाली असून रक्षकच भक्षक बनला आहे.

न्याय मिळवून देणे हे कार्य असताना अन्याय ग्रस्त महिलेचा गैर फायदा घेणाऱ्या या पो निरीक्षकाच्या वागणुकी मुळे पोलीस खात्यातील लोकांवर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न जन सामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button