Mumbai

?️ विश्वकप विजेता जोगिंदर शर्मा सह प्रसिद्ध खेळाडू करत आहेत पोलीस कर्तव्य

?️ विश्वकप विजेता जोगिंदर शर्मा सह प्रसिद्ध खेळाडू करत आहेत पोलीस कर्तव्य

पी व्ही आनंद

मुंबई | कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन मध्ये असताना क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केलेले राष्ट्रीय खेळाडू या काळातील त्यांची पोलीस ड्युटी अतिशय जबाबदारीने पार पाडताना दिसत आहेत.

टी २० विश्वकप विजेत्या टीम मधील गोलंदाज जोगिंदर शर्मा, भारतीय हॉकी टीमचा माजी कप्तान राजपाल सिंह, राष्ट्रमंडळ क्रीडा सुवर्णपदक विजेता मुष्टीयोद्धा अखिल कुमार आणि आशियाई खेळ चँपियनशिप कब्बडी खेळाडू अजय ठाकूर अशी या खेळाडूंची नावे आहेत.

हे सर्व खेळाडू आता पूर्णवेळ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या खेळातील योगदानामुळेच त्यांना पोलीस विभागात नोकरी मिळाली आहे.

2007 च्या टी-20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध शेवटची ओव्हर टाकून भारताला विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावलेले जोगिंदर हरियाना पोलीस मध्ये डीएसपी आहेत. त्यांच्या मते पोलीस ड्युटीमधले हे वेगळेच आव्हान असून कोविड 19 बद्दल जागृती, औषधोपचार आणि लोकांना बंद पालन करण्यास प्रवृत्त करण्याचं कामे ते करत आहेत.

दरम्यान, कोरोनाविरूद्धच्या लढाईत प्रत्येकजण आपापल्यापरीने लढत आहे. त्यामुळे सर्व देशवासीयांनीसुद्धा सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करावं.असे आवाहन या सर्व खेळाडूंनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button