Pandharpur

सरकोली ग्रामस्थांच्यावतीने युवा उद्योजक अभिजीत पाटील यांचा सत्कार शेतकऱ्यांशी संवाद व शेतकऱ्यांनी सांगितल्या उसाच्या अडचणी

सरकोली ग्रामस्थांच्यावतीने युवा उद्योजक अभिजीत पाटील यांचा सत्कार
शेतकऱ्यांशी संवाद व शेतकऱ्यांनी सांगितल्या उसाच्या अडचणी

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील ग्रामस्थांच्यावतीने युवा उद्योजक अभिजीत (आबा )पाटील यांचा ग्रामस्थांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कोवीड काळात ऑक्सिजनची कमतरता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी देशात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी देशातील उद्योजकांना ऑक्सीजन प्लांट तयार करण्याचे आव्हान केले होते.त्यास प्रतिसाद देत युवा उद्योजक अभिजीत आबा पाटील यांनी अवघ्या 11दिवसात ऑक्सीजन प्रकल्प तयार करून कार्यान्वित केला. अनेक दिवसापासून बंद अवस्थेत असलेला सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना अवघ्या 35 दिवसात सुरू करून पहिली उचल दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडली. तसेच आबांना कोविड योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल सरकोली ग्रामस्थांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.सत्कारास उत्तर देताना युवा उद्योजक अभिजित पाटील म्हणाले की, आपला सोलापूर जिल्हा सोडून उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव येथील बंद अवस्थेत असणारा कारखाना सुरू केला. इतर कारखाने प्रमाणे दर देऊन धाराशिव कारखाना ऊर्जा अवस्थेत आणला. नंतर नाशिक ,नांदेड येथे धाराशिव युनिट 2 व 3 सुरू करून इतर कारखान्या प्रमाणे ऊस दर दिला. सोलापूर जिल्ह्यात अनेक कारखाने बंद अवस्थेत आहेत. त्यातील पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत आहे.तो सुरू होणार की नाही याची शाश्वती नसल्याने ऊस गाळपाचे मोठे संकट तालुक्यावर आले आहे.उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माननीय शरद पवार व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असणारा सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर धाराशिव युनिट 4 अवघ्या 35 दिवसात सुरू करून ऊसाची पहिली उचल दोन हजार प्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली. तोडणी, वाहतूक बिलेही अवघ्या पंधरा दिवसात खात्यावर जमा केली.युवकांनी उद्योग-धंद्यात स्वतःचे करिअर करून एकमेकांच्या पायात पाय न घालता एकमेकांच्या हातात हात घालून काम व रोजगार निर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी केले.शेतकऱ्याशी संवाद साधून उसाच्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा केली.
श्रीनिवास भोसले यांनी पंढरपूर तालुक्यात एक स्थानिक युवक नेतृत्व तयार होत असून त्यास तरुण युवक व सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी दत्ता कराळेसर ,महादेव तळेकर, रयत क्रांती चे दीपक भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास श्रीनिवास भोसले ,उमेश काका मोरेचळे , दीपक भोसले ,लक्ष्मण तात्या भोसले, हरिभाऊ बेद्रे, राजेंद्र भोसले, महादेव भोसले, गोपाळ भोसले ,श्रीकृष्ण भोसले ,पवन बेंद्रे ,उमेश भोसले व शेतकरी, ग्रामस्थ व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक श्रीनिवास भोसले यांनी केले तर आभार सुधीर कराळे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button