Pandharpur

योग विद्या धाम,लायन्स क्लब पंढरपूर व सावरकर प्रेमी मंडळ यांच्या वतीने शिक्षक दिन साजरा :- विवेक परदेशी आपत्कालीन परिस्थिती निवारणाच्या सर्व क्षेत्रात शिक्षकांचे बहुमोल योगदान

योग विद्या धाम,लायन्स क्लब पंढरपूर व सावरकर प्रेमी मंडळ यांच्या वतीने शिक्षक दिन साजरा :- विवेक परदेशी आपत्कालीन परिस्थिती निवारणाच्या सर्व क्षेत्रात शिक्षकांचे बहुमोल योगदान

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर :सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व समाज अनेक संकटांचा
सामना करत असताना शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व शिक्षकवृंदांनी जे अतुलनीय योगदान दिले आहे ते अमूल्य आहे अशी भावना लायन्स क्लब व योग विद्या धाम पंढरपूर व सावरकर प्रेमी मंडल यांच्या ऑनलाइन व ऑफलाईन पध्यतीने आयोजित शिक्षक दिनामध्ये श्री अशोक ननवरे व श्री विवेक परदेशी यांनी व्यक्त केली. शिक्षक दिनानिमित्त सावरकर क्रांती मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून श्री दिपक ईरकल, डॉ.सचिन लादे, श्री विनोद शेंडगे(संगीत शिक्षक), श्री उमेश तारापूरकर, योगशिक्षक अशोक ननवरे, श्रीमती ललिता कोळवले, सौ स्वाती जोशी, सौ मैत्रीयी केसकर, सौ अपर्णा बनवस्कर, मंजुशा कुलकर्णी, ज्योती उत्पात, सुनील यारगट्टीकर, माधव कुलकर्णी, गिरीश भिडे, मंजिरी देशपांडे, हेमलता यारगट्टीकर, अमरजा कुलकर्णी, अभय आराध्ये, आशा क्षिरसागर यांचा सन्मान करण्यात आला.
जलनेती अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सौ निता जामदार व क्रष्णा जामदार गुजराथी, संगीता ननवरे, सुचिता ननवरे, सौ स्वाती ननवरे व मयुरी नवनरे यांचा ही सत्मान करण्यात आला.याप्रसंगी बोलताना श्री दीपक ईरकल यांनी आयुष्यामध्ये गुरुंचे महत्व, तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षकांनी ज्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि शिक्षणही सुरू ठेवले त्याचा आढावा घेतला. हे सर्व करत असताना कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करता सर्व शिक्षक कार्यरत आहेत, याचा आवर्जून उल्लेख केला. लायन्स क्लब आणि योग विद्या धाम यांनी या कार्याची नोंद घेऊन शिक्षकांचा सन्मान केला त्याबद्दल आभार मानले. श्रीमती ललिता कोळवले यांनी एक शिक्षिका म्हणून आपली जडणघडण, त्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा सहभाग, शिक्षिका म्हणून केलेला संघर्ष सांगितला, सौ स्वाती जोशी यांनी विद्यार्थी आणि शिक्षक एकमेका समोर शाळेत नसल्याने होणारी तगमग बोलून दाखवली, श्री विनोद शेंडगे यांनी गुरुकुल शिक्षण पद्धतीचे महत्त्व शिक्षणातील योग आणि संगीत यांचे महत्त्व विशद केले. श्री उमेश तारापूरकर यांनी हा सन्मान सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका यांचा असल्याचे नमूद केले. डॉ.सचिन लादे यांनी शिक्षक स्वतःच ज्ञान आणि अनुभवाने विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत असतो त्याची जाणीव समाजाला आहे व बहुतांशी शिक्षक हे अत्यंत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत याची नोंद या दोन मोठ्या संस्थांनी घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री विवेक परदेशी यांनी आम्हाला आर्दश शिक्षकांचा सत्मान करायची संधी मिळाली याबाबत आम्ही भाग्यशाली असल्याचे सांगितले व सदर प्रसंगी शिक्षकांचे मनोगत ऐकुन प्रेरणा मिळली असल्याचे सांगितले. योग विद्या धाम चे प्राचार्य श्री अशोक ननवरे सर यांनी सर्व साधकांच्या साह्याने जलनेती सारखे राबवलेले विविध उपक्रम, कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरले, याबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी लायन्स क्लब च्या उपाध्यक्ष सौ मृणाल गांधी, श्री ओंकार बसवंती, योगसाधक उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग विद्या धामचे साधक किशोर ननवरे, श्री विठ्ठल केसकर ,श्री आर. एस. कुलकर्णी ,श्री कटप यांनी मदत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अश्विनी आराध्ये यांनी केले. पाहुण्यांची ओळख सौ मैत्रेयी केसकर यांनी करून दिली.
कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सौ अमरजा कुलकर्णी यांनी केले तर आभार सौ विजया नाईक यांनी केली.
कार्यक्रमाची सांगता विश्वकल्याण प्रार्थनेने झाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button