Bollywood

Bollywood: ये तुम्हारे भाई का घर नहीं मेरा लॉक अप हैं…ड्रामा क्वीन कंगना ने साधला एकाच वेळी दिपीका आणि सलमान वर निशाणा..!लवकरच करणार रियालिटी शो होस्ट…!

Bollywood: ये तुम्हारे भाई का घर नहीं मेरा लॉक अप हैं…ड्रामा क्वीन कंगना ने साधला एकाच वेळी दिपीका आणि सलमान वर निशाणा..!लवकरच करणार रियालिटी शो होस्ट…!

मुंबई बॉलिवूडची ड्रामा क्विन कंगना रणौत लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म अँकरिंग करताना दिसणार आहे. निर्माती एकता कपूरच्या लॉकअप या शोमध्ये कंगनाचा नवा अवतार प्रेक्षाकांना पाहायला मिळणार आहे. या शोच्या प्रमोशन दरम्यान कंगनाने तिची छोटीशी झलक सर्वांना दाखवून दिली. पत्रकार परिषदेत कंगनाला दीपिका पदुकोण विषयी प्रश्न विचारल्यानंतर कंगनाने तिचा रुद्र अवतार सर्वांना दाखवला त्याचप्रमाणे बिग बॉस वरुन भाईजान सलमानची देखील तिने चांगलीच खिल्ली उडवली.

अभिनेत्री दीपिका पदुकोनला तिच्या गहराइया सिनेमाच्या प्रमोशनवेळी छोट्या कपड्यांवरुन चांगलेच ट्रोल करण्यात आले. याविषयी लॉकअपच्या प्रमोशनवेळी कंगनाला प्रश्न विचारण्यात आला. दीपिकाला तिच्या कपड्यांवरुन ट्रोल करण्यात येत आहे. महिला सशक्तीकरणावर याचा काय प्रभाव पडतो असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. त्यावर कंगानाने आपला रुद्र अवतार दाखवत म्हटले. ‘जे लोक स्वत:साठी बोलायला आवाज उठवू शकत नाही त्याच्यासाठी बोलायला मी इथे आलेले नाही. दीपिकाकडे स्वत:चा आवाज आहे. तिचा वेगळा फॅन क्लब आहे. ती स्वत:चा बचाव स्वत: करु शकते. मी तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी इथे आलेली नाही’, असे म्हणत कंगनाने प्रश्न विचारणाऱ्या प्रत्रकाराला खाली बसण्याचा सल्ला दिला.

कंगना सतत तिच्या वादग्रस्त विधानांवरुन चर्चेत असतेच मात्र यावेळी तिने दीपिकाविषयी केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी तिचे समर्थन केले आहे.तर दुसरीकडे कंगनाने भाईजान सलमान खानवर देखील चांगलाच निशाणा साधत त्याची खिल्ली उडवली. कंगनाचा लॉकअप या नव्या शोमध्ये जेल असणार आहे. शोमध्ये सामील होणाऱ्या १६ स्पर्धकांना ७२दिवस कंगनाच्या जेलमध्ये राहावे लागणार आहे. त्यामुळे याविषयी बोलताना कंगना म्हणाली. हे तुमच्या भाईचे घर नाही माझे जेल आहे. माझ्याकडे सगळ्या स्पर्धकांची फाइल आहे आणि त्यात सर्वांची सत्य आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button