Chimur

महिलेचा विहिरीत बुडुन मृत्यू..चिमूर शहरातील आझाद वार्ड येथील घटना

महिलेचा विहिरीत बुडुन मृत्यू..चिमूर शहरातील आझाद वार्ड येथील घटना,

चिमूर ता डॉ,ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर दिनांक 5/9/2022 श्रीमती कविता आशिष पाटील वय 35 वर्ष, राहणार वाशी तालुका कुरखेडा या महिलेने चिमूर येथिल विहिरीत बुडून मृत्यू झाले आहे
सविस्तर माहिती अशी की , मृतक महिला ही चिमूर आझाद वार्ड येथील आपल्या नातेवाईकडे दिनांक 3/9/2022 ला रोजी आली होती व ती स्मिता संदीप जांभूळकर यांच्याकडे ती राहत होती , आपले निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी आली होती व तिला माहिती झाली आहे की सासू नामे उषा अशोक पाटील यांना दिनांक 5/9/2022 ला नागपूर येथे कँसर च्या उपचार करण्यासाठी भरती केले होते तेव्हा पासून मृतक महिला आपल्याच विचारात राहत होती , रात्र वेळ 9 :30 घरचे सगळे मंडळी जेवण करून झोपी गेले स्मिता अंदाजे वेळ 10;30 च्या सुमारत बाथरूम जाण्यासाठी उठली असता घराचा दरवाजा उघडा दिसलाने व कविता घरी न दिसल्यामूळे इकडे तिकडे शोधाशोध केला असता घराजवळ असलेल्या एक विहिरी वरील विहिरीचे वरचे लोखंडी जाळी उघडी दिसली व विहिरीत बघितले असता एक कोणीतरी पाण्यात बुडून दिसले अशी माहिती फिर्यादी महिलेने पोलीस यांना तोंडी माहिती दिली व चिमूर पोलीस यांनीं मर्ग दाखल केला व चिमूर पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अलीम शेख, व त्यांची चमू तपास करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button