Nandurbar

गुन्हा दाखल झाले नंतर २४ तासाचे आत अपहृत मुलीचा शोध घेण्यात पोलीसांना आले यश

गुन्हा दाखल झाले नंतर २४ तासाचे आत अपहृत मुलीचा शोध घेण्यात पोलीसांना आले यश

नंदुरबार फहिम शेख

दिनांक १९/०९/२०२१ रोजी नंदुरबार शहरातील वाघेश्वरी टेकडी भिलाटी परीसरात राहणारी अल्पवयीन मुलगी नामे संगिता राजु वळवी, वय १० वर्षे, ही दुपारी ०३.०० वा. च्यासुमारास परीसरातील दुकानावर दुधाची पिशवी घेण्यास गेली असता ती परत घरी आली नाही तिचा तिचे पालकांनी नातेवाईकांकडे व नंदुरबार शहरात शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाही म्हणुन तीचे अपहरण झाले बाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ईसमाविरोधात दिनांक २०/०९/२०२१ रोजी कालीबाई रोहीदास पाडवी यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर अपहत मुलीचा शोध घेणकामी उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी सदर गुन्हयाचे तपास अधिकारी सपोनि/ नंदा पाटील यांना मार्गदर्शन करुन तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथक तयार करुन घटनास्थळी तात्काळ भेट देवून विचारपुस केली त्यादरम्यान घटनास्थळाचे आजुबाजुचे साक्षीदार यांना व गुप्त बातमीदार यांचे कडे विचारपुस करुन सदर गुन्हयातील अपहत मुलीचा शोध घेणेकामी महत्तवाचे धागेदोरे गोळा करणे पोलीसांनी सुरु केले पोलीसांनी नंदुरबार शहर व परीसर अपहृत मुलीचे नातेवाईक व मुलीस ओळखणारे यांचे मदतीने पिंजुन काढुन सदर अपहृत मुलीचा गुन्हा दाखल झालेनंतर २४ तासाचे आत शोध घेतला व सदर अपहत मुलीचा शोध घेवुन तिला तिचे पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील सो, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार साो, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे साो, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि किरणकुमार खेडकर, सपोनि/नंदा पाटील, पोहेकॉ/ ५६२ कृष्णा पवार, पोहेकॉ/२२ रविंद्र पवार, पोना/ ९३२ अमोल जाधव, पोकों/६५० संदीप गायकवाड यांनी केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button