Amalner

?️ शहरातील पेट्रोलपंप वरील पेट्रोल ची धार पोहचली ग्रामीण किरकोळ विक्रेत्यांकडे पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांचा चोरीछुपे काळाबाजार

?️ शहरातील पेट्रोलपंप वरील पेट्रोल ची धार पोहचली ग्रामीण किरकोळ विक्रेत्यांकडे
पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांचा चोरीछुपे काळाबाजार

रजनीकांत पाटील

अमळनेर : तालुक्यातील अमळनेर येथे पेट्रोल पंपवरील पेट्रोल हे अत्यावश्यक सेवा तसेच पास व ओळखपत्र दाखवून मिळत आहे तरी देखील ग्रामीण भागात पेट्रोल ची धार पोहचत असल्याचे दिसून आले मात्र या बाबत धक्कादायक बाबा म्हणजे पेट्रोल पंपावर वर काम करणारे कर्मचारी यांचा समावेश असल्याची चर्चा मात्र गावभर सुरू आहे.

हे पेट्रोल पंपावर काम करणारे काही कर्मचारी हे आपल्या गाडीची पेट्रोल टॉकी भरून आणत व तेच पेट्रोल गाडीच्या टॉकी तुन बिस्लरी बाटली चा अंदाज घेऊन एक लिटर ला त्याची विक्री गावात गल्लीत 100 रुपये लिटर करत त्या मुळे गावातील घरीच बसणाऱ्या रिकामटेकडे त्या पेट्रोल ला जादा दर देऊन विकत घेत फायदा उचलत गावात मोटारसायकल वर हिंडत असल्याचे दिसत आहे त्यात किरकोळ दुकानदारांना पेट्रोल चा 20 ते 25 लिटर चा ड्रम कसा काय भरून मिळवतो आणि कुठून मिळवतो ते देखील जादा दर आकारत चोरी छुपे मार्गे पेट्रोल विकत आपला खिसा भरत आहे या बाबत चर्चा आहे.

या बाबत किरकोळ दुकानदार तसेच पट्रोल पंपवरील कर्मचारी यांचा सुरू असलेला हा काळा बाजार यावर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button