Nandurbar

संशयीत आरोपीना कोर्टात हजर केले असता…

संशयीत आरोपीना कोर्टात हजर केले असता…

जुना बैल बाजार घटनेत पकडलेले 28 आरोपिंपैकी 22 आरोपिंना आज मा. नंदुरबार न्यायालयात हजर केले असता आरोपी पक्षाकडून ऍड. अजर पठान व ऍड. परवेज कागजी यांनी युक्तिवाद करत पोलिसांवर ताशेरे ओढले ऍड. कागजी यांनी 8 आरोपिंचे बचाव करतांना न्यायालयासमोर सांगितले की, सदर आरोपी हे सर्व एकच कुटुंबाचे असुन त्यांनी या अगोदर एक केस मध्ये पोलिसांनी त्यांच्यावर केलेल्या अत्याचार विरुद्ध मा. उच्च न्यायालय औरंगाबाद येथे याचिका दाखल केली आहे, त्याचे खुन्नस म्हणुन पोलिसांनी सदर लोकांना या केसमध्येही अडकवले असुन अर्ध्यारात्रीच्या वेळी ह्या लोकांना घराचे दार तोडून मारत मारत बाहेर काढले व मारत मारत ठाण्यात नेण्यात आले व तेथेही संबंधितांना बेदम मारण्यात आले. एका घटनेचा अडोखा घेऊन पोलिस निष्पाप लोकांशी छळ करत आहे. मा. न्यायालय ने याची दखल घेत संबंधित 8 आरोपिंना विचारले असता सर्वांनी न्यायालयासमोर शरीरावर पोलिसांनी मारल्याचे निशाण दाखवले असता त्यांची तक्रार दाखल करत न्यायालयने पुन्हा त्यांचे मेडिकल करून हजर करण्याचे आदेश पोलिसांना केले.
ऍड. कागजी यांनी सांगितले की पोलिस फिर्याद मध्ये दोन गटात तुफान दगडफेक व दारूचे काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्याचे सांगण्यात आले असुन त्यांच्यानुसार सर्व प्रसारमाध्यमांनीही अशीच बातमी व घटनास्थळाचे चित्र प्रसारित केले परंतु FIR मध्ये सुमारे 150 पैकी निष्पन्न 59 आरोपिंमधुन 28 पकडण्यात आले त्यात एकच गटाचे 27 तर दुसऱ्या गटाचे फक्त 3 आरोपी त्यात ही 2 फरार असुन पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऍड. अजहर पठान यांनी सांगितले की FIR मध्ये ज्या घटनेचा उल्लेख करत दंगल घडल्याचे सांगण्यात आले, ती सुमारे 7 महिने अगोदरची असुन त्या भागात चालत असलेला अवैध जुगार अड्डयावर झालेल्या भांडणाचे रस्त्यावर येऊन दंगलीत रूपांतर झाले असुन सत्य घटनेला लपवण्याचे प्रयत्न पोलिस करत अस्सल आरोपिंना वाचवत आहे व आपल्या रचलेल्या पिक्चर स्क्रिप्ट मध्ये निष्पाप लोकांना गोवण्याचे काम करत आहे.
आरोपी पक्षाचे दोन्ही वकिलांचे युक्तीवाद ऐकल्यानंतर मा. न्यायालयने उर्वरित आरोपिंना 9 एप्रिल पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
मा. न्यायालयासमोर आरोपी पक्षाचे वकिलांकडून सदर युक्तीवादानंतर आता पोलिसांचे तपास योग्य दिशेने चालतील का ? याकडे सर्वांचे लक्ष असुन शहरात चर्चेचे बाजार गरम आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button