sawada

सावदा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांचे पोषण आहार संचालकांचे तोंडी जाते तेव्हा…

सावदा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांचे पोषण आहार संचालकांचे तोंडी जाते तेव्हा…

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये शासनाने एकंदरीत ५ महिन्याचे पोषण आहाराचे तांदूळ,हरबरा,मुंगदाळ नियमानुसार शाळेतील प्रति विद्यार्थी वाटत देण्याचे आदेश दिले असता सदर प्रकरणी कागदोपत्री औपचारिकता पूर्ण दाखवून काही तथाकथित शाळा संचालक यांनी वाटप मध्ये मापात पाप करून विद्यार्थ्यांचे तोंडाचे घांस कमी करून स्वतः चे व नातेवाईकांचे पोषण केल्याची चर्चा पालक वर्गातून थेट आता गावात जनमानसात चर्चेला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,नुकतेच शालेय पोषण आहार योजना अंतर्गत मार्च २०२२ च्या पहिल्या आठवड्यात संबंधित शिक्षण विभागा व प्रशासनाने विद्यार्थ्यांना एकंदरीत ५ महिन्याचे मुंगदाळ,हरबरा व तांदूळ यांचे वितरणाचे ठरवून दिलेल्या प्रमाणात सदरील शाळेत वाटत करण्यात आली नसल्याने पालक वर्गात नाराजी पसरली असून याबाबत गावात तर्कवितर्क लढवले जात असून या आधी सुद्धा याच शाळेतील तांदूळ वाटत प्रकरणी हेराफेरी केल्याचा प्रकार अधिक गाजलेला होता.म्हणून सध्याची तांदूळ व इतर धान्यादी वाटप देखील संशयाच्या भोव-यात सापडली असून? याप्रकरणी भुसावळ येथील न.पा. उर्दू शाळेचे शिक्षक तथा सदरील शाळेचे चेअरमन व काही तथाकथित निवडक संचालक यांच्या घशात जात असल्याची चर्चा समजते?तरी या शाळेची गेल्यावेळीच्या पार्श्वभूमीचा विचार करून शालेय पोषण आहार अधीक्षक रावेर व शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी जातीने लक्ष देण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button