sawada

खडे भूखंड विक्री करणारी मंडळी पासून जनता सावधगीर बाळगत नाही तेव्हा?

खडे भूखंड विक्री करणारी मंडळी पासून जनता सावधगीर बाळगत नाही तेव्हा?

——————————————————–
“सध्या या आरक्षित शेत जागेवर पालिका प्रशासनाच्या नाका खाली नविन बांधकाम सह लोखंडी शेड उभारण्यासाठी भूखंड घेणार कामाला लागल्याचे दिसून येते,तरी याकडे तात्काळ पालिकेने लक्ष देवून हे अवैध काम होवू न देण्यासाठी तात्काळ योग्य तो उपाययोजना कराव्यात, तसेच ही जागा क्रीडांगणसाठी आरक्षित असून,क्रिडाप्रेमींच्या मागणीनुसार तसा ठराव मुख्याधिकारी कडून होवून मिळावा.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे”
——————————————————-

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपालिकेच्या हद्दीत मरीमाता मंदिर मागील क्रिडांगण साठी आरक्षीत शेत जमीनवर खडे भूखंड टाकून विक्री करण्यासाठी काही बाहेरील भुमाफिया गेल्या दोन महिन्यांपासून शर्तीचे प्रयत्न करीत असून,याच दरम्यान अशा भूमाफिया पासून तसेच एन.ए.नसलेले खडे भूखंडाचे व्यवहार कोणी कोणाकडून करू नये,असे भूखंडावर प्रशासना तर्फे सोयीसुविधा उपलब्ध होत नसून हे व्यवहार गैर समजण्यात येते, या करीता आधीच स्थानिक वार्ताहरांकडून वेळोवेळी बातम्या ही प्रसारित करण्यात आल्या,यानंतर सावदा न.पा.मुख्याधिकारी यांनी प्राप्त तक्रारीवरून जनहितार्थ एका दैनिकात जाहिरात सुद्धा प्रसिद्ध केली होती,असे असताना येथील अनेक भोळ्या भाबड्या लोकांनी भूखंडाची ठरलेली रकमेतून निम्मी रक्कम प्रतेकांनी या भूमाफियांचा भूलथापांना बळी पडून योग्य-अयोग्य न पाहता अशा प्रकारे लाखोंची रक्कम देवून दिली आहे.व सध्या या लोकांकडून उर्वरित पुर्ण रक्कम घेऊन या भुखंड घेणाऱ्यास पुढील परिणाम भोगण्यास वाऱ्यावर सोडून हे भुमाफिया मार्गस्थ होवून जाईल,हे मात्र खरे आहे.तसेच गेल्या ४ ते ५ दिवसांपूर्वी या आरक्षित जागेची शेत म्हणून सावदा दुय्यम निबंधक कार्यालयात काही बाबी लपून दस्त नोंदणी करुन घेतल्याचे समजते.परिणामी या दस्त नोंदणीचे काही जागरूक नागरिकांकडून सनदशीर मार्गाने लवकरच उत्खनन केले जाईल,व यात कायदेशीर तुरट्या आढळून आल्यास ही दस्त नोंदणी रद्द ठरवण्यासाठी थेट जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button