sawada

सावद्यात विविध ठिकाणी देशाच्या ७५ व्या स्वतंत्र दिवस उत्साहात झाला साजरा

सावद्यात विविध ठिकाणी देशाच्या ७५ व्या स्वतंत्र दिवस उत्साहात झाला साजरा

पो.उ.निरीक्षक समाधान गायकवाड यांना पोलीस विशेष सेवा पदक बहाल

“आधी चंद्रपूर येथे सेवेत असताना विशेष कामगिरी केल्याबद्दल भारत सरकार,केंद्रीय गृहमंत्रालयच्या आदेशान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक सह मान्यवरांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सध्या सावदा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना १५ ऑगस्ट दिनानिमित्त जळगांव येथे महाराष्ट्र विशेष सेवा पुरस्कार व पदक बहाल करून सन्मानित करण्यात आले.”
—————————————-
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे हर घर तिरंगा मोहीम जनजागृती मुळे शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात आला असून यंदाचे स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव निमित्त सावदा नगरपरिषदे,पोलीस स्टेशन,विज वितरण कार्यालय,श्री आ.ग.हायस्कुल,कन्या शाळा,ॲंग्लो उर्दू हायस्कूल, अल्कवी खाजगी उर्दू शाळा,न.पा.उर्दु व मराठी मुलां मुलींच्या शाळा,इत्यादी ठिकाणी देशभक्तीच्या उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले
यंदा स्वतंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव संपूर्ण भारतातील सर्व देश प्रेमी नागरिककडून एका उत्सव व सन प्रमाणे साजरा केला गेला आहे.

म्हणूनच या १५ ऑगस्ट रोजी सावदा येथील हाजी इक्बाल हुसैन मल्टीपर्पस फाउंडेशनद्वारा संचालित डायमन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सकाळी ९ : वाजता स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऍक्टिव्हिटी कार्यक्रमात येथील विद्यार्थी मुलामुलींनी इंग्लिश,उर्दू,हिंदी,मराठी भाषेत स्पीच दिल्या व देशी वेशभूषेत देशभक्‍तीवर आधारित गीत व सादरीकरण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या दरम्यान उद्योगजक हाजी शब्बीर हूसैन उर्फ बाबू सेठ यांचे पुत्र जाफर सेठ व केळा व्यापारी शेख सलीम सेठ यांचे पुत्र अरबाज शेख यांनी नुकतेच सीएची पदवी मिळवल्याने या दोघांचे मान्यवरांनी सत्कार केले.यावेळी हाजी इक्बाल मेंबर डायमंड शाळेचे सचिव हाजी हारून सेठ माजी नगरसेवक फिरोज खान पठाण,उद्योगपती बाबू सेठ व त्यांचे पुत्र (सीए) जाफर सेठ,माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, सिमरन वानखेडे,एपीआय देविदास इंगोले,मुख्याधिकारी किशोर चव्हाण, डॉ.शोहेब खान,हाजी अजमल सेठ,सुरज परदेशी,समाजसेवक गजू ठोसरे, राजू कोल्हे,कादिर हाजी,नाजीम शेख डायमंड शाळेचे विद्यार्थी आणि पालक वर्ग सह सर्व टीचर स्टॉप व कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

*सावदा येथे शहीद अब्दुल हमीद इस्मार्कवर मान्यवरांनी पुष्पचक्र केले अर्पण.*

तसेच आज १५ ऑगस्ट रोजी गावातील शेखपुरा भागात परमवीर चक्र प्राप्त शहीद अब्दुल हमीद यांच्या भव्य स्मारकवर राजेश वानखेडे नगरसेवक फिरोज खान पठाण,नगरसेवक राजेंद्र चौधरी, सिद्धार्थ बडगे,एपीआय देविदास इंगोले,माजी नगराध्यक्षा अनिता येवले नगरसेविका नंदाताई लोखंडे ,रेखा वानखेडे,सिमरन वानखेडे,करूणा पाटील,मीनाक्षी कोली,पालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण,विशाल पाटील, पत्रकार फरीद शेख,युसूफ शाह,साजीद शेख,सुरज परदेशी,गजू ठोसरे, शहीद अब्दुल हमीद संस्थेचे अध्यक्ष शेख मुख्तार शेख अरमान सचिव फिरोज खान,अमजद खान,अंनिस भाई, हुसैन भाई, कादर खान यांनी पुष्पचक्र अर्पण केला.याप्रसंगी शहीद अब्दुल हमीद स्मार्कला NCC प्राध्यापक संजय महाजन सह श्री.आ.ग.हायस्कूलचे एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सलामी देत परेड केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button