Pachora

जो बंद करेल गावातील सट्टा, पत्ता, दारु त्यालाच आम्ही मतदान करु. कुऱ्हाड येथील महिलांचा जाहीर फतवा.

जो बंद करेल गावातील सट्टा, पत्ता, दारु त्यालाच आम्ही मतदान करु. कुऱ्हाड येथील महिलांचा जाहीर फतवा.

पाचोरा : रजनीकांत पाटील

पाचोरा : पाचोरा तालुक्यात९६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका निश्चित झाल्या असून येत्या पंधरा जानेवारी शुक्रवाररोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सगळीकडे ग्रामपंचायत निवडणूकीची धामधूम सुरु असून आपलेच उमेदवार कसे निवडून येतीलकरीता सगळ्यांनीच कंबर कसली आहे.
यातच पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावच्या ग्रामपंचातीच्या निवडणूक प्रचाराला जोमाने सुरुवात झाली आहे.
यात कुऱ्हाड खुर्द या गावात नम्रता पॅनल व ग्रामविकास पॅनल मध्ये समोरासमोर सरळ लढत असून दोघांनी मते मिळवण्यासाठी सर्वप्रकारच्या क्लुप्त्या वापरणे सुरु केले असले तरी गावातील महिलांनी या निवडणुकीत मतदान करतांना सावध पावित्रा घेत
जो उमेदवार कुऱ्हाड गावातील सट्टा, पत्ता, दारु हे अवैधधंदे बद करतील त्यांनाच आम्ही मतदान करु असे कुऱ्हाड येथील महिलांनी सत्यजीत न्यूज जवळ बोलून दाखवले.
कारण कुऱ्हाड खुर्द गावात बसस्थानक परिसर, भरवस्तीत, हमरस्त्यावर तसेच धार्मिक स्थळांजवळ सट्टा बेटिंग व देशी व गावठीदारुची दिवसाढवळ्या खुलेआम विक्री रात्रंदिवस सुरु असते. विशेष म्हणजे कुऱ्हाड येथून जवळपासच्या दहा गावांना गावठी दारुचा पुरवठा होतो. तसेच गावापासून जवळच एका शेतात कुऱ्हाड येथील रहिवासी परंतु कामानिमित्त आमदाबाद येथे रहात असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत जुगाराचा अड्डा सुरु आहे. या कारणांमुळे गावातील अल्पवयीन मुले, तरुण वर्ग व जेष्ठ नागरिक सट्टा, पत्ता, दारुच्या आहारी गेल्याने बरीचशी कुटुंब बर्बाद झाली असून काही बर्बादिच्या मार्गावर आहेत. तसेच चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच व्यसनाधीनतेत लहान मुले व तरुणांचा जास्त समावेश असल्याने हा प्रकार चिंताजनक आहे. तसेच व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपुर्तीसाठी संसारपयोगी वस्तू, दागदागिने विकून तर स्थावर मालमत्ता गहाण ठेवून हा पैसा व्यसनात उडवतात व यामुळे घराघरात भांडणतंटे होऊन महिलांचा छळ होत आहे. म्हणून
मागील पाच वर्षापासून सुज्ञ नागरिक व महिलांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनपासून डी.वाय.एस.पी, डी.एपी, डी.आय.जी, आमदार खासदार यांच्यापर्यंत तक्रारी करुनही काही एक फायदा होत नाही.
कारण या अवैधधंदे करणारांना राजाश्रय मीळतो असा आरोप करत पोलीस तसेच जबाबदार अधिकारी हप्ते घेतात असा आरोप महिलांनी केला असून येत्या पंधरा जानेवारी पर्यंत हे अवैध बंद न झाल्यास आम्ही नकारात्मक मतदान करणार आहोत व याचे परिणाम निवडणूकीत दिसून येतील असे सांगून संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
आता बघूया कोण काय निर्णय घेते किंवा कायद्याचे रक्षक काय भूमिका घेतात या आशेवर त्रस्त महिला जीवन जगत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button