Faijpur

धानजी नाना महाविद्यालयात योग आणि प्राणायाम ऑनलाईन कार्यशाळांचे उदघाटन संपन्न

धानजी नाना महाविद्यालयात योग आणि प्राणायाम ऑनलाईन कार्यशाळांचे उदघाटन संपन्न

सलीम पिंजारी

फैजपूर- धनाजी नाना महाविद्यालया मध्ये आज एक सप्ताह ऑनलाईन कार्यशाळेचे उदघाटन प्रा. आरती गोरे मॅडम यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी सर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सतीश चौधरी यांनी केले, तर सुत्रसंचलन डॉ. गोविंद मारतळे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक यांनी केले व आभार प्रा.शिवाजी मगर यांनी मानले.

कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी के. सी. ई. सोसायटीच्या योग विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. आरती गोरे यांनी योगा बद्दल बरीच माहिती सांगितली. प्रा. गोरे मॅडम यांनी योगाच्या अंतरंग व बहिरंग योग आणि त्यांच्या माहिती बद्दल सांगितले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी साहेब यांनी अध्यक्षीय भाषणात योगाचे सध्याच्या युगात महत्व या विषयी सांगितले. तसेच ताण तणाव कमी करण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी योग हे आपल्या प्राचीन ऋषी मुनींची देणगी आहे त्याचा जीवनात आमल केल्यास निरोगी जीवन जगता येते असे सांगितले. डॉ. सतिश चौधरी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आरोग्यासाठी योग आणि त्यांचे महत्व या विषयी सांगितले. योग आणि प्राणायामाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य डॉ.गोविंद मारतळे हे करणार आहेत.

दररोज होणारे उपक्रम पुढील प्रमाणे दिनांक 16 जून, 2020 रोजी सामान्य व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि रील्याक्सएशन, दिनांक 17 जून, 2020 रोजी सामान्य व्यायाम, योग, प्राणायाम आणि रील्याक्सएशन, दिनांक 18 जून, 2020 रोजी सामान्य व्यायाम, योग, प्राणायाम आणि रील्याक्सएशन, दिनांक 19 जून, 2020 रोजी सामान्य व्यायाम, योगासन, प्राणायाम, ओम उचार आणि रील्याक्सएशन, दिनांक 20 जून, 2020 रोजी सामान्य व्यायाम, योगासन, प्राणायाम, ओम उचार आणि रील्याक्सएशन, दिनांक 21 जून, 2020 रोजी सामान्य व्यायाम, योगासन, प्राणायाम, ओम उचार, रील्याक्सएशन आणि प्रश्न मंजुषा होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button