Pachora

पाचोऱ्यात परराज्यातुन येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड टेस्ट तपासणीस सुरूवात

पाचोऱ्यात परराज्यातुन येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड टेस्ट तपासणीस सुरूवात

पाचोरा : जिल्हाधिकारी, जळगांव यांचेकडील दि. २० रोजीच्या आदेशान्वये पाचोरा रेल्वे स्टेशन येथे आज दि. २२ पासून पाचोरा रेल्वे स्टेशनवर रेल्वेने परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट केल्याशिवाय शहरात प्रवेश न देण्यासाठी विशेष कॅम्पची सुरूवात करण्यात आली आहे. सदरचे कॅम्पचे आयोजन तालुका वैद्यकिय अधिकारी पाचोरा, वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालय पाचोरा, नगरपरिषद पाचोरा व रेल्वे प्रशासन पाचोरा यांचे संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यांत आले आहे. यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, उपस्थित होते. रॅपिड अॅंनटीजन टेस्ट करणेसाठी शहरी आरोग्य कर्मचारी श्रीमती भारती पाटील, बनिता जाधव, आकाश ठाकूर हे कर्मचारी उपस्थित होते. त्यांना मदतनीस म्हणून नगरपरिषदेचे कर्मचारी शामकांत अहीरे, शरीफ खान हे उपस्थित होते. तसेच रेल्वे प्रशासनाचे मनोज सोनवणे, टी. सी. कृष्णा शर्मा, आर. पी. एफ. हे देखील उपस्थित होते. आज रोजी १० रेल्वे प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १ प्रवासी हा पाॅझीटीव्ह आढळून आलेला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button