Amalner

अमळनेर तांबापूर परिसरात पाण्याची टाकी उघडी..झाकण नाही…कुणीतरी दगावल्या नंतर झोपलेली न प जागी होईल का..? न प प्रशासन आंधळं दळंत आणि कुत्रं पिठ खातं…

अमळनेर तांबापूर परिसरात पाण्याची टाकी उघडी..झाकण नाही…कुणीतरी दगावल्या नंतर झोपलेली न प जागी होईल का..? न प प्रशासन आंधळं दळंत आणि कुत्रं पिठ खातं…

अमळनेर येथील तांबेपूर परिसरात पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीतून परिसरात पाण्याचा पुरवठा होतो. ही पाण्याची टाकी रस्त्याला लागून असलेल्या नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलाच्या मागील बाजूस आहे.ह्या पाण्याच्या ह्या टाकीला झाकण नाही.विशेष म्हणजे भर पावसाळ्यात हे झाकण उघडे आहे वरून पडणारे सर्व पावसाचे पाणी या टाकीत पडत आहे तेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी दिले जात आहे.पावसाळ्यात अनेक साथीचे रोग लवकर होतात.या उघड्या पाण्याच्या टाकीत किडे,जनावर,प्राणी,पक्षी मरून पडू शकतात.त्यांचं मृत शरीराचं विष होऊन विषबाधा होऊ शकते.उडणारे पक्षी घाण टाकतात ती देखील या टाकीत पडत आहे. तसेच उंचावर असल्याने पक्षी मोठ्या प्रमाणात येथे बसतात व घाण करतात.शीट करतात ती देखील पिण्याच्या पाण्यात जात आहे. हा निव्वळ नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. अमळनेर नगरपरिषद डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे. लवकरात लवकर ह्या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे.

या परिसरात लहान लहान बालक टाकी वर चढून स्टंट बाजी करीत असतात.टाकीला झाकण नसल्याने कोणाच्या पाय घसरून खाली पडण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा कोणास वर घेऊन दारू पाजून घात करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्याच प्रमाणे टाकीच्या परिसरात प्रवेश अगदी सहज होतो येथे प्रवेशद्वार नाही.कोणतीही सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात नाही.कोणीही कर्मचारी उपस्थित नसतो यामुळे कोणीही सहज ह्या टाकीवर जाऊ येऊ शकतो. एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वीच नगरपरिषदेच्या प्रशासन अधिकारी यांनी सावध होऊन पुढील होणारे अनर्थ टाळावे व लवकरात लवकर झाकण बसवावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

या अगोदरदेखील नागरिकांनी ह्या संदर्भात अमळनेर न प त तक्रार केली होती पण कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत.सध्याची परिस्थिती पाहता अगदी वाईट काळ आहे कोणाची मानसिकता केंव्हा बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे अमळनेर न प ने झोपेतून जागे होऊन तात्काळ या टाकीला झाकण बसवावे तसेच गेट देखील बसवावे अशी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार भरत पवार यांनी मागणी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button