Delhi

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान

आम आदमी पार्टी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे.

निवडणुकीसाठी 13 हजार 750 मतदान केंद्रांवर जवळपास 1.46 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

तिरंगी लढत : दिल्लीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा असा तिरंगी सामना आहे.

2015 मध्ये दिल्लीत 70 पैकी 67 जागांवर आपचे उमेदवार निवडून आले होते. भाजपाला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button