Pandharpur

फॅबटेकच्या विराज गावडे या विद्यार्थ्यांची टीसीएस व कॅपजेमिनी या नामांकित कंपनी मध्ये निवड

फॅबटेकच्या विराज गावडे या विद्यार्थ्यांची टीसीएस व कॅपजेमिनी या नामांकित कंपनी मध्ये निवड

प्रतिनिधी
रफिक आतार

सांगोला : येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विराज गावडेची या विद्यार्थ्यांची टीसीएस व कॅपजेमिनी या नामांकित सॉफ्टवेअर कंपनी मध्ये निवड झाली असून त्यांना वार्षिक ३.३६ लाखाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
टीसीएस हि अंतरराष्ट्रीय आयटी कंपनी असून ती एक भारतातील दिगज्ज कंपनी आहे. भारतासह ४६ देशांमध्ये या कंपनीचा विस्तार आहे.कॅपजेमिनी हि आयटी सेक्टर मधील मल्टिनॅशनल कंपनी असून तिचे हेड ऑफिस पॅरिस येथे आहे. शिवाय या कंपनीचा ५० पेक्षा जास्त देशात विस्तार असून हि कंपनी सॉफ्टवेअर व सर्विस पुरविण्याचे काम करते.अशी माहिती सीव्हिल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ.अभिमान कणसे यांनी सांगितले. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर, श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी एन जगताप, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अभिमान कणसे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर, सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button