Nandurbar

शहाद्यात रॅली काढून मनाई आदेशांचे उल्लंघन; १५० जणांवर गुन्हा दाखल

शहाद्यात रॅली काढून मनाई आदेशांचे उल्लंघन; १५० जणांवर गुन्हा दाखल

नंदुरबार/फहिम शेख

पोलीस प्रशासनाकडून कारवाई; परवानगी न घेताच रॅली

नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश लागू केले असतानाही श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी शहादा येथे १५० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी ही रैली काढण्यात आली होती.शहादा येथे श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर प्रेसमारुती मंदिराच्या प्रांगणातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. रॅलीत १०० ते १५० जणांचा सहभाग होता. दरम्यान, जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यात सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मनाई आदेश लागू केले आहेत. यामुळे रॅलीला पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. यानंतरही रॅली काढल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.शनिवारी याबाबत पोलीस नाईक दत्तात्रय बागुल यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजा ऊर्फ राजेंद्र दिलीप साळी, चंद्रकांत ऊर्फ गुहू जगन्नाथ पवार, धीरुभाई जागाभाई पटेल, केशव देविदास पाठक, प्रशांत किशोर पाटील, मनीष सुरेश चौधरी, नरेंद्र हिरालाल वाडिले, वैभव ऊर्फ विक्की तांबोळी, प्रदीप ऊर्फ आबा चौधरी, नितीन तिरमले, राधेश्याम निक, अजिंक्य जव्हेरी, विकी चौधरी, निलेश शिंदी, कुशल धनानी, नितीन तिरमले, दिनेश शांतीलाल खंडेलवाल, पंकज मनसुखलाल सोनार, विनोद हुकुमचंद जैन, भटू सुपडू भोई, अक्षय प्रमोद अमृतकर, नितीन बद्रीनाथ गुरव, पुष्कर जोशी, मारी ऊर्फ मोहित ब्रिजलाल पाटील, वैभव भावसार, सनी ऊर्फ पराग संजय सोनार, अक्षय चौधरी, बाबा पानपाटील, डॉ. किशोर पाटील, प्रदीप चौधरी, अप्पू पाटील, विठ्ठल बच्छाव यांच्यासह सुमारे १५० जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button