Chandwad

परीक्षा पे चर्चा,कार्यक्रमात नेमिनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत आमदार राहुल आहेर सहभागी

परीक्षा पे चर्चा,कार्यक्रमात नेमिनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत आमदार राहुल आहेर सहभागी

उदय वायकोळे चांदवड

” परीक्षा पे चर्चा ” या मा. पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा देशातील विद्यार्थ्यांशी संवादात्मक कार्यक्रमात चांदवड येथील नेमिनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत आमदार डॉ राहुल आहेर सहभागी झाले.
स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील , साखला अॉडीटोरिअम हॉल मध्ये परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणात असंख्य विद्यार्थी सहभागी झाले. मा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनमोल विचार व मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना मिळाले.परीक्षा पे चर्चा अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमधील दहा निवडपात्र विद्यार्थी असे…. १) शिवानी प्रमोद चव्हाण २) सिद्धी प्रितीश डुंगरवाल ३) समिक्षा नवनाथ गांगुर्डे ४) ओम भास्कर गांगुर्डे ५) आयुषी अमित दायमा ६) सानवी बळीराम हिरे ७) राशी राजेश व्यवहारे ८) श्रृती अनंत पगारे ९) प्रतिक्षा गोरख निकम १०) प्रतिक्षा वाल्मिक गांगुर्डे….
या चित्रकला स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना मा. आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवर असे…गटशिक्षणाधिकारी संदिपकुमार शिंदे , प्राचार्य डॉ कोकाटे , प्राचार्य बाफणा ,उपप्राचार्य डॉ दत्तात्रेय शिंपी , उपप्राचार्य डॉ सुरेश पाटील , उपप्राचार्य डॉ मनोज पाटील , अशोक काका व्यवहारे , मनोज शिंदे ,परीक्षा संयोजक ॲड शांताराम भवर , संदिप समदडीया , कलाशिक्षक के. व्ही. अहिरे , मुख्याध्यापक संदिप महाले , मुख्याध्यापक निवृत्ती आहेर , प्रा सोहनी , बाबासाहेब गांगुर्डे , प्रा श्रीकांत वाघ , कमलेश लव्हारे , चित्रकला स्पर्धा परीक्षा सहसंयोजक मुकेश आहेर , विशाल ललवाणी व संजय पाडवी आदी मान्यवरांनी निवड प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळा पाडवी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन कर्मचारीवृंदांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button