Nashik

वामनदादा कर्डकांनी आपल्या साहित्य शाहिरीतून संविधानिक विचार मूल्य लोकमाणसात रुजवले : डॉ.उत्तम अंभोरे यांचे प्रतिपादन.

वामनदादा कर्डकांनी आपल्या साहित्य शाहिरीतून संविधानिक विचार मूल्य लोकमाणसात रुजवले : डॉ.उत्तम अंभोरे यांचे प्रतिपादन.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक ‌: माणसाच्या विचार प्रक्रियेत होणाऱ्या बदलाचा परिवर्तनाचा विचार संविधानात केला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उभे केलेले मानव मुक्ती व उद्धाराचे लढे,राष्ट्र निर्माण कार्य व त्यांचा वैचारिक कार्य कृतीचा सांगावा वामनदादा कर्डकांनी आपल्या साहित्य शाहिरीतून संविधानिक विचार मूल्य लोकमाणसात रुजवले असे मत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अभ्यासन व इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.उत्तम अंभोरे यांनी व्यक्त केले.
धर्मांतर घोषणेचा ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ती महोत्सव समिती मुक्तीभूमी येवला चे निमंत्रक,प्रवर्तक शरद शेजवळ यांच्या संकल्पनेतून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १३ ऑक्टोबर २०२१ पासून ऑनलाईन मुक्ती महोत्सव -२०२१ सुरू आहे त्यात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या साहित्य शाहिरीतील संविधानिक विचार मूल्य या विषयावर परिसंवादात डॉ.उत्तम अंभोरे बोलत होते.
मानवाचा सर्वांगीण विकास,जाती निर्मूलन, धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचा केंद्र बिंदू होता.
जगातील अनेक राष्ट्रातील गुलामी शोषणा विरुद्धचे बंड आणि आफ्रिका,अमेरिकन लोकांच्या गुलामगिरीचा सूक्ष्म अभ्यास डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केला.भारतात सर्व समजतील लोकांना सोबत घेत,मानवी मूल्य व हित संवर्धन ,मानवी हक्क व कर्तव्य नीट समजून घेतले,एक व्यक्ती एक मूल्य मतदानातून सिद्ध केले आहे ,देश भक्ती एकमेकांचा सन्मान केला,संविधान निर्मितीसाठी बाबासाहेब आंबेडकरांना मोठा संघर्ष करावा लागला,
वामनदादा कर्डकांनी बाबासाहेब आंबेडकरांन बद्दल हिंदी,मराठी भाषेतून प्रभावी काव्य-गीत लेखन केले.साहित्य निर्मितीसाठी दैवी शक्ती लागते हा खोडसाळ प्रचार असून यांचा संबंध साहित्य अथवा कुठल्याही मानवी सृजन कौशल्याशी नाही ती केवळ अंधश्रद्धा आहे.वामनदादांनी लोक व्यथा,वेदना,परिवर्तनवादी विचार तंत्रशुद्ध शब्दा पेक्षा लोकभाषेतून लिहिले,
आंबेडकरी गीतांची प्रेरणा सत्य शोधकी व आंबेडकरी जलसा राहिली आहे.
मराठी भाषेला समृद्ध करण्याचे काम संत तुकोबा,महात्मा फुलेयांनी केले तर वामनदादांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजविण्याचे काम केले आहे.माणसाचा जगण्याचा,क्रांतीचा विचार व जगण्याचे मूल्य वामनदादा कर्डकांच्या साहित्य साहिरीतून मिळाला असे डॉ. अंभोरे म्हणाले.
जो बिका जाय ओ गद्दारोका वंश है।
जो ना बिका उस में उसमे आंबेडकर का अंश है।
या कर्डकांच्या काव्य ओळी या वेळी त्यांनी ऐकवल्या.
परिसंवादात डॉ.किशोर वाघ यांनी वामनदादा कर्डक यांनी लोकशाही,समता,स्वातंत्र्य, न्याय,बंधुता,राष्ट्रवाद,वैज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रीय एकात्मता,धर्मनिरपेक्षता या मूल्यांची कसी मांडणी केली आहे ते कर्डक यांच्या अनेक गीतांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
माणसाचे माणसाशी नैतिक वर्तन म्हणजे धम्म होय. असे उदगार त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रमाचे उदघाटन कवयित्री तारका हरेंद्र जाधव यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन करून केले.अध्यक्ष स्थानी कविवर्य विनायक पाठारे हे होते.परिसंवाद व कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक शरद शेजवळ,तांत्रिक साहाय्य प्रा.राहुल सुर्यवंशी यांनी केले.सूत्रसंचालन व आभार स्नेहल सोनटक्के यांनी मानले.
सुरेश खळे,शैलेंद्र वाघ सर,सुभाष वाघेरे,अमीन शेख, मिलिंद गुंजाळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button