Parola

शिरसमनी येथे शॉक लागून 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू

शिरसमनी येथे शॉक लागून 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू

रजनीकांत पाटील

पारोळा तालुक्यातील शिरासमनी येथे दि 21 रोजी दुपारी दोन वाजता राहत्या घरी इले शॉक लागून एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.या बाबत युनूस गणी खाटीक यांनी पारोळा पोलिसात खबर दिली कि,ता,21 रोजी सकाळी 11.30 वाजता मुक्तार अकील खाटीक (वय 23 ) या तरुणास गल्लीतील विजेच्या खांबास इलेक्ट्रीक शाँक लागल्याने तो बेशुध्द पडल्याची माहीती मिळताच माझे सोबत आप्पा पाटील,पंढरीनाथ माळी,कैलास महाजन,संतोष महाजन,बाळु पाटील यांनी त्यास पारोळा कुटीर रुग्णालय येथे आणले असता उपचारादरम्यान त्याच्या मृत झाल्याचे घोषित डाँ योगेश साळुंखे यांनी केली.याबाबत अकस्मात मृत्युची नोंद होवुन तपास सुधीर चौधरी करित आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button