Ahamdanagar

मॅडम, टिटवीचे मटण खाता काय? बदली करणार’ असे म्हणत तलाठ्याने तहसीलदारांना दिली धमकी..!

‘मॅडम, टिटवीचे मटण खाता काय? बदली करणार’ असे म्हणत तलाठ्याने तहसीलदारांना दिली धमकी..!

अहमदनगर : सुनील नजन

‘मॅडम, तुम्ही टिटवीचे मटण खाता काय,’ असा सवाल एका तलाठ्याने मोठ्या जमावासमोर तहसीलदार मॅडमला विचारला. यानंतर त्याने मॅडमला सांगितले की, ‘आम्हाला तुमच्यामुळे दिवस-रात्र काम करावे लागते, म्हणून चार ते पाच दिवसात आम्ही तुमची बदली करणार आहोत. तुमची बदली करायची असे आमच्या संघटनेने ठरवले आहे.’

एवढेच बोलून तो थांबला नाही तर त्याने आम्हाला तुमच्या हाताखाली काम करायचे नाही आणि आम्ही तुमची बदली करणार, अशी धमकीही दिली. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना तलाठी विनायक निंबाळकर यांनी जमावासमोर हे प्रश्न केले त्यामुळे तहसीलदार देवरे यांनी निघोज येथे कार्यरत असलेले तलाठी विनायक निंबाळकर यांनी गैरवर्तन केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांना केली आहे

तहसीलदार ज्योती देवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सद्यस्थितीमध्ये कोरोना आपत्तीमुळे सर्व तलाठ्यांनी मुख्यालयी राहून कामकाज करावे, यासाठी मी वारंवार प्रयत्नशील आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष असणारे निंबाळकर त्यांनी चारचौघांसमोर बोलून तालुका दंडाधिकारी या पदाचा अपमान केला आहे व महिला तहसीलदार असल्याने त्यांनी माझी मानहानी केली आहे. वास्तविक निंबाळकर मुख्यालयी राहात नाहीत.

निवारागृहाच्या नावाने आलेल्या देणग्या परस्पर रोख स्वरूपात स्वीकारतात. त्यांचा हिशोब सादर केला नाही. वारंवार सांगूनही ते दिवसाआड निघोज गावी येतात. निघोज येथे राहण्याची त्यांना सक्ती केल्यामुळे त्यांनी माझ्यावर बेछूट वक्तव्य केले आहेत. त्यांनी माझ्या पदाचा कोणताही मुलाहिजा ठेवला नाही. तसेच आपत्ती काळामध्ये ते जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथून दैनंदिन ये-जा करत आहेत. त्यामुळे निघोज सारख्या संवेदनशील गावात अन्य तलाठ्याचीनेमणूक करावी व सदर तलाठ्यास गैरवर्तनाबाबत निलंबित करण्यात यावे, तसेच तहसीलदारांनी कमी काम करावे, असे बोलून ते आपत्ती व्यवस्थापन कामात अडथळा निर्माण करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button