Korpana

नांदाफाटा औद्योगिक परिसरात लसीकरण आरोग्य विभागाच्या चमूचे उत्कृष्ट कार्य शिवचंद्र काळे यांचे मागणीला यश

नांदाफाटा औद्योगिक परिसरात लसीकरण
आरोग्य विभागाच्या चमूचे उत्कृष्ट कार्य शिवचंद्र काळे यांचे मागणीला यश

कोरपना
नांदाफाटा औद्योगिक परिसरात अनेक दिवसांपासून लसीकरण बंद होते आज 16 आगस्ट रोजी नांदा व आवारपुर येथे ५०० डोज लस उपलब्ध करुन आरोग्य विभागाच्या चमूने विश्रांती न घेता न थकता अथक प्रयत्न करू नागरिकांचे लसीकरण केले आहेत नांदाफाटा औद्योगिक परिसरातील लसीकरण वाढविणार असल्याची माहिती असून दिनांक १८ अाॅगस्ट राेजी परत याठिकाणी लसीकरण होणार आहेत
नांदाफाटा औद्योगिक परिसरात लोकसंख्येच्या अनुपात लसीकरण कमी होत असल्याने येथील लसीकरण वाढविण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शिवचंद काळे यांनी जिल्हा परिषदेकडे लावून धरली होती त्या अनुषंगाने आज ५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले अनेक दिवसांपासून लसीकरण बंद असल्याने लसीकरण केंद्रावर नागरिकांची प्रचंड गर्दी होती नागरिकांच्या गोंधळात लसीकरण कार्यक्रम राबविणे फार अडचणी व त्रासाचे असते परंतु आरोग्य विभागाच्या चमूने विश्रांती न घेता न थकता अथक परिश्रम करून नागरिकांची लसीकरण व्यवस्थित केले
नांदाफाटा सांस्कृतिक भवनामध्ये स्थानिक नागरिक शेळ्या बांधतात मोटारसायकली पार्किंग करतात व गंदगी करतात येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारीच या नागरिकांचे पाठीराखे असल्याने येथील नागरिक मनमानीप्रमाणे कारभार करीत आहे गंदगीमुळे लसीकरण करण्यास अडथळा निर्माण झाला होता नांदा ग्रामपंचायतीचे सचिव पंढरीनाथ गेडाम यांनी त्यांची प्रकृती ठिक नसतानांही माहिती मिळताच तातडीने परिसराची स्वच्छता करून देत आरोग्य विभागाच्या चमूची उचित व्यवस्था करून दिली तसेच यापुढे सांस्कृतिक भवनाचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांवर ग्रामपंचायतीचे प्रशासक व सचिवांमार्फत कठोर कारवाई केली जाणार आहेत
जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांच्या प्रयत्नांमुळे आज नांदाफाटा औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण झाले आहेत औद्योगिक परिसर असल्याने मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्याची विनंती जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहेत आरोग्य विभागाच्या चमूने विश्रांती न घेता अथक परिश्रम घेऊन लसीकरण व्यवस्थित पार पाडल्याने नागरिकांनी आरोग्य विभागाच्या चमूचे अभिनंदन केले आहे
आरोग्य विभागाच्या चमूने आज उत्कृष्ट कार्य केले आहे यापुढे लसीकरण केंद्रावर ग्रामपंचायतीकडून सर्व सोयीसुविधा व्यवस्थितपणे पुरविल्या जातील तसेच सांस्कृतिक भवनात शेळ्या बांधणार्‍या व मोटर गाड्या पार्किंग करणाऱ्या नागरिकांवर ग्रामपंचायतीमार्फत कठोर कारवाई करणार आहेत अशी माहिती नांदा ग्रामपंचायतीचे सचिव पंढरीनाथ गेडाम यांनी दिली आहे

संबंधित लेख

Back to top button