Korpana

कोरपना येथे शेतकरी मेळावा ; शेतीमुळेच अर्थव्यवस्था बळकट विजय वडेट्टीवार

कोरपना येथे शेतकरी मेळावा ; शेतीमुळेच अर्थव्यवस्था बळकट विजय वडेट्टीवार

कोरपना : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेचे चक्र कोडमडले असताना शेती आणि शेतकरी यामुळेच अर्थव्यवस्था टिकून असल्याचे मत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरपना येथे आयोजित शेतकरी मेळावा प्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा चे आमदार सुभाष धोटे, प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर वनी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव थीपे , राजुरा चे नगराध्यक्ष अरुण धोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधरराव गोडे, उपसभापती योगेश्वर गोखरें,
जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावने , जिल्हा परिषद सदस्य कल्पना पेचे, विना मालेकर, पंचायत समिती उपसभापती सिंधुताई आस्वले,
सदस्य शाम रणदिवे , संभा कोवे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, माजी नगराध्यक्ष कांताताई भगत, तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा ललिता गेडाम , माजी नगर उपाध्यक्ष मनोहर चने, शहराध्यक्ष सुनील बावणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण निमजे , आबिद अली आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा कना आहे. त्यामुळे शेतीच्या दृष्टिकोनातून विविध योजना शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना सुद्धा होतो आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. शेतकरी मेळाव्यापूर्वी कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालय इमारतिचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन उमेश राजूरकर तर आभार सचिव कवडू देरकर यांनी मानले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सर्व संचालक, तालुक्यातील शेतकरी आदी उपस्थित होते.

कान्हाळगाव – येलापुर रस्त्याचे भूमिपूजन

कोरपना – जिवती तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावाला जोडणारा कन्हालगाव – सावलहिरा – येलापुर रस्त्याचे भूमिपूजन पालक मंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी आमदार सुभाष धोटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

———————————————
पत्रकार प्रतिनिधींना मात्र ताटकळत उभे राहून बातमी संकलन करावी लागली कोरपना मध्ये झालेल्या शेतकरी मेळावा मध्ये पत्रकार प्रतिनिधींना मात्र बसण्याची व्यवस्था नसल्याने बातम्या ताटकळत उभे राहून संकलन करावी लागलीत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button