Amalner

लेखी स्वरूपात आदेश व विम्याचे संरक्षण मिळाल्यानंतरच लसीकरण व टॅगीग करणार… खाजगी पशुवैद्यकीय संघटनेच्या वतीने आमदारांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन..

लेखी स्वरूपात आदेश व विम्याचे संरक्षण मिळाल्यानंतरच लसीकरण व टॅगीग करणार… खाजगी पशुवैद्यकीय संघटनेच्या वतीने आमदारांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन..

रजनीकांत पाटील
अमळनेर :- जो पर्यंत आम्हाला पन्नास लाखाचा विमा सुरक्षा मिळणार नाही, व कामाचे लेखी स्वरूपात आदेश देण्यात येत नाहीत, तो पर्यंत आम्ही लाळ खुरगट लसीकरण करणार नाही आणि टॅगीग सुद्धा करणारच नाही असा इशारा व त्यासंदर्भात निवेदन अमळनेर तालुक्यातील खाजगी पशुवैद्यकीय संघटनेकडून देण्यात आले.

खाजगी पशुवैद्यकीय संघटना अमळनेर तालुक्याच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, सह पशुउपायुक्त जळगाव, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, अमळनेर व तालुक्यातील आमदार अनिल भाईदास पाटील यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रभर १ सप्टेबर पासुन लसीकरण करण्याचे व त्या जनावराला टॅगिंग करण्याचे ठरविले आहे. परंतू महाराष्ट्र शासनाकडे व आपणाकडे परीपुर्ण मनुष्यबळ नसल्याकारणाने खाजगी पशुधन पर्यवेक्षक व खाजगी पशुवैद्यकिय संघटना यांना तोंडी सुचना केल्या आहेत. परंतू आम्ही लसीकरण करु शकतो. पण टॅगींग करु शकत नाही त्यामुळे या काम करण्यासंदर्भात आपण आम्हाला लेखी स्वरुपात आदेश करावे व या कोरोनाच्या महामारीत काम करताना जर का आमचा खाजगी पशुवैद्यकिय डॉक्टर जर बाधीत झाला तर त्याला इतर सेवांमध्ये काम करणाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने ५० लाखाचा विमा कवच दिलेला आहे. त्या संदर्भात आपण आपल्या स्तरावर पाठपुरावा करत असाल तरच आम्ही शेतकर्यांच्या हितासाठी व जनावराच्या आरोग्यासाठी हे काम करण्यास तयार आहोत. तद्नंतर गेल्या १९ वर्षापासुन पशुधन पर्यवेक्षक पदाची भरती केली गेली नाही त्यासाठी सुद्धा आपण आपल्या वरीष्ठांकडे पाठपुरावा करावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button