Nandurbar

नंदुबार येथील हजरत पीर सैय्यद अल्लाउद्दीन उर्फ इमाम बादशहा यांचा 21 ऑगस्ट रोजीचा ऊर्स रद्द करण्याचा ऊर्स कमिटीचा निर्णय

नंदुबार येथील हजरत पीर सैय्यद अल्लाउद्दीन उर्फ इमाम बादशहा यांचा 21 ऑगस्ट रोजीचा ऊर्स रद्द करण्याचा ऊर्स कमिटीचा निर्णय

नंदुरबार फहिम शेख

सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणु (COVID-१९) या साथीच्या आजाराचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने अधिसूचना जारी करण्यात आलेल्या आहे. तसेच नंदुरबार जिल्हयात कोरोना विषाणूचे वाढते संसर्ग लक्षात घेता, मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी जिल्हा आपत्ती व व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालय, नंदुरबार यांचे कडील क्र.कक्ष/ आपत्ती/कोरोना विषाणु/ कावि/४९५/२०२१ दि १२/०८/२०२१ अन्वये दिनांक-१५/०८/२०२१ चे ००/०१ वाजे पासून पुढील आदेशा पावेतो कोविड- १९ संदर्भात आदेश पारीत केले आहेत. त्यात सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे प्रार्थना स्थळे पूढील आदेशा पावेतो बंद करणयत आले असून सर्व प्रकारचे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध ठेवण्यात आले आहेत. तसेच क्रमांक २०२१/ड/ कक्ष- २ पीओएल/कावि- ४९७ जिल्हाधिकारी कार्यलय दिनांक-१४/०८/२०२१ अन्वये दिनांक १५/०८/२०२१ ते दिनांक-३१/०८/२०२१ पावेतो महाराष्ट्र पोलीस अधिनियम २०१२ चे कलम ३७ (१)(३) प्रमाणे मनाई आदेश व जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत.

कोविड-१९ या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेवुन व जिल्हावासीयांच्या तसेच भाविकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने सालाबादा प्रमाणे नंदुरबार शहरात होणारा हजरत पीर सैय्यद अलाउद्दीन (इमाम बादशहा रहे) यांचा उत्सव (ऊर्स) रद्द करण्याचा निर्णय ऊसं कमिटी यांनी घेतलेला आहे. त्याबाबतचे लेखी पत्र कमिटीचे अध्यक्ष समिउल्लाह मिया अ.गनी पिरजादे , सज्जादे नशिन समीउल्लाह मीयाँ यांनी मा. जिल्हाधिकारी सो, मा. पोलीस अधिक्षक सो.नंदुरबार व शहर पोलीस स्टेशन नंदुरबार यांना दिले आहे. त्यामुळे नंदुरबार शहरात दिनांक-२१/०८/२०२१ रोजी होणारा हजरत पीर सैय्यद अलाउद्दीन (इमाम बादशहा रहे ) यांचा उत्सव (ऊर्स) रद्द झालेला आहे.

तरी कोणीही भाविकांनी ऊरुस मध्ये नंदुरबार शहरातील हजरत पीर सैय्यद अलाउद्दीन (इमाम बादशहा रहे) यांच्या दर्ग्या जवळ व अव्वल गाझी दग्यां अथवा परीसरात भाविकांनी गर्दी करु नये असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे

संबंधित लेख

Back to top button