Maharashtra

नंदुरबार कलेक्टरकडून सूचना’ शिर्षकाखालील संदेश चुकीचा

नंदुरबार कलेक्टरकडून सूचना’ शिर्षकाखालील संदेश चुकीचा

प्रतिनिधी फहिम शेख

नंदुरबार दि.2- जिल्ह्यातील काही व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘नंदुरबार कलेक्टरकडून सूचना’ या शिर्षकाखाली लॉकडाऊनबाबत सूचना देणारा संदेश मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड करण्यात येत आहे. या संदेशात वृत्तपत्र बंद करा, शेजाऱ्यांशी संवाद बंद, बेकरी सामन बंद आदी विविध दिशाभूल करणाऱ्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.

असा कोणताही संदेश जिल्हा माहिती कार्यालय नंदुरबारतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. हा संदेश नागरिकांमध्ये गैरसमज पसरविणारा असून नागरिकांनी असा संदेश कोणालाही फॉरवर्ड करू नये. कोणी फॉरवर्ड करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचना जिल्हा माहिती कार्यालयाचे ट्टिवटर हँडल @infonandurbar आणि फेसबुक पेज Collector Office Nandurbar वर वेळोवेळी देण्यात येतात, तसेच वृत्तपत्रांमधून प्रकाशित करण्यासाठी पाठविण्यात येतात, असे जिल्हा माहिती अधिकारी डॅा.किरण मोघे यांनी कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button