Ahamdanagar

लाचेच्या जाळ्यात दोन वनाधिकारी, तीस हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

लाचेच्या जाळ्यात दोन वनाधिकारी, तीस हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
अहमदनगर सुनील नजन

लाकूड वाहतुकीला परवानगी देण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना वन विभागाच्या अहमदनगर कार्यालयातील सहायक वनसंरक्षक सुनील रतन पाटील (वय ५७) आणि वन परिक्षेत्राधिकारी सुनील अच्युतराव थेटे (वय ५६) या दाेघांना पकडले आहे. लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने अहमदनगरमध्ये गुरूवारी रात्री ही कारवाई केली.
यातील तक्रारदार यांचे लाकूड वाहून नेणारे वाहन कारवाई करत वन विभागाने पकडले हाेते. ते कारवाई न करता सोडून दिले. यासाठी तक्रारदाराकडून या दाेघांनी ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील पहिल्या टप्प्यात ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून ३० हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना पाटील व थेटे यांना नाशिक पथकाने गुरुवारी पकडले.
लाचलुचपत नाशिक परिक्षेत्राचे पाेलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पथकाचे पाेलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, पोलीस नाईक प्रकाश महाजन, बाविस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button