Amalner

हेडावे शिवारातील रढावन येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू..!

हेडावे येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू..!

अमळनेर तालुक्यातील हेडावे शिवारातील रढावन येथील मणीलाल धोंडू पाटील(काळे) यांच्या मालकीच्या शेतगट क्र 130/2 शेतात काम आटोपल्यावर झाडा खाली सावलीत दोन बैल बांधलेले होते. अचानकपणे दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दोन्ही बैल वीज पडून मृत स्वरूपात आढळून आले.बैलांसह बैलगाडी, वखर व इतर सामानाचे ही नुकसान झाले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी गणेश महाजन,हर्षवर्धन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून साधारणपणे बैल जोडी 150000/- व इतर सामान असे नुकसान झाले आहे.सदर घटनेचा पंचनामा करून पुढील कार्यवाही साठी अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या कडे पाठविण्यात आला आहे. शासकीय स्तरावर मदत करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button