Bollywood

अंगावर शहारे आणणारा ’83’ चा ट्रेलर प्रदर्शित.. 1983च्या विश्व चषकाचा थरार

अंगावर शहारे आणणारा ’83’ चा ट्रेलर प्रदर्शित.. 1983च्या विश्व चषकाचा थरार

मुंबई बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा बहुचर्चित चित्रपट ’83’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीरच्या 83 चित्रपटामधील लूकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपट कबीर खान यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे.

टीम इंडियाने 1983 मध्ये वेस्ट इंडिजला हरवून आपला पहिला विश्वचषक जिंकला. या चित्रपटात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना यांच्याही भूमिका आहेत. दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीदेखील आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button