World

Tokyo olympics…अभिमानास्पद…41 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हॉकीत ब्राँझपदक..चक दे इंडिया…

Tokyo olympics…अभिमानास्पद…41 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हॉकीत ब्राँझपदक..चक दे इंडिया.

Tokyo Olympics तब्बल 41 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय हॉकी टीम ने इतिहास रचत ब्राँझपदक पटकावले आहे. सामन्यातील 25 व्या मिनिटाला 3-1 पिछाडीवर असताना जबरदस्त कमबॅक करत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला पराभूत करुन दाखवले. या विजयासह भारतीय संघाने ब्राँझ पदकावर नाव कोरले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने 3 गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने 2 गोल डागून जर्मनीला बॅकफूटवर ढकलले. कांस्य पदकाच्या लढती भारतीय संघाने 5-4 असा विजय नोंदवला. 1980 मध्ये 1 गोलच्या फरकाने भारतीय संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यानंतर तब्बल 41 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली आहे.भारत आणि जर्मनी यांच्यातील कांस्य पदकाच्या लढतीमध्ये जर्मनी संघाने पहिल्या क्वार्टरमध्येच आघाडी घेतली होती. दुसऱ्या मिनिटालाच जर्मनीकडून तैमूर ओरुझ याने पहिला गोल करत भारतीय संघाला मागे टाकले.खेळाच्या दुसऱ्या भागात सुरुवातीलाच 17 व्या मिनिटाला भारतीय संघाने जर्मनीला प्रत्युत्तर दिले. निलकंठ शर्माने दिलेल्या पासच्या जोरावर सिमरनजीत सिंगने भारतीय संघाला 1-1 बरोबरीचा गोल करुन दिला. भारताने सामन्यात बरोबरी साधल्यानंतर जर्मनीने अवघ्या चार मिनिटात दोन गोल डागत भारतीय संघाला पुन्हा एकदा अडचणीत आणले. त्यानंतर भारतीय संघाला पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नर मिळाला.

सामन्यातील 25 व्या मिनिटाला 3-1 पिछाडीवर असताना जबरदस्त कमबॅक करत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला पराभूत करुन दाखवले. या विजयासह भारतीय संघाने ब्राँझ पदकावर नाव कोरले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button