Karamala

करमाळा तालुक्यात खाजगी सावकारांचे धाबे दणाणले कविटगांव येथील अमोल कांबळे आत्महत्या प्रकरणी तिन अवैद्य सावकारांवर गुन्हा दाखल

करमाळा तालुक्यात खाजगी सावकारांचे धाबे दणाणले कविटगांव येथील अमोल कांबळे आत्महत्या प्रकरणी तिन अवैद्य सावकारांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी : लक्ष्मण कांबळे करमाळा

करमाळा : करमाळा तालुक्यातील कविटगांव येथील तरूण अमोल रामचंद्र कांबळे याच्या आत्महत्या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात तिन खाजगी सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील चंद्रकांत उर्फ दादा सोनवणे , स्वप्निल उर्फ बाळू सोनवणे आणी रमेश शंकर चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत.
मयत अमोल कांबळे याने सावकार चंद्रकांत सोनवणे व बाळु सोनवणे यांच्याकडून एका वर्षापुर्वी 1लाख 85 हजार रूपये हाॅटेल व्यवसायाकरिता व्याजाने घेतले होते त्या बदल्यात त्याने प्रती महिना 30 हजार रूपये प्रमाणे 3लाख 60 हजार रुपये परत देखील केलेले होते .आणी रमेश शंकर चौधरी याच्याकडून 70 हजार रूपये घेतले होते त्याला 55 हजार रूपये परत केले होते परंतु हे अवैद्य सावकार अवाजवी ज्यादा पैशाची मागणी करत तगादा लावत होते. त्यांनी अमोल याला दोन वेळा लाथा बुक्यांनी मारहाण केली होती.त्यांच्या सतत च्या होणा-या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून अमोलने दि.17 डिसेंबर 2020 रोजी विषारी औषध प्राशन केले.उपचारा दरम्यान दुस-या दिवशी सकाळी 9 वाजता त्याचा मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती
भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे याना मिळताच मयत अमोल कांबळे याच्या कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले व अमोलच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या अवैद्य सावकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.आणि आण्णासाहेब रामचंद्र कांबळे याने फिर्यादी दिली होती.
पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केलेली असुन लवकर उर्वरित आरोपींना अटक करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस आधिकारी डाॅ. विशाल हिरे यांनी माहिती दिली आहे.

Leave a Reply

Back to top button