Karamala

एका शिक्षकाने 20 लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे- डॉ. शरद थोरात आरोग्य अधिकारी

एका शिक्षकाने 20 लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे- डॉ. शरद थोरात आरोग्य अधिकारी

अरण केंद्राची कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना, प्रत्यक्ष कार्यवाही व मार्गदर्शन संदर्भात मुख्याध्यापक, शिक्षक यांची अरोग्यअधिकरी, माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मारूती फडके यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सभा झाली.त्यात अरोग्यअधिकरी डॉक्टर शरद थोरात यांनी एका शिक्षकाने कमीत कमी 20 पात्र लाभार्थांना कोविशिल्ड लसीकरणासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन केले.मुख्याध्यापक,शिक्षकांच्या ऑनलाईन सभेत ते मार्गदर्शन करत होते.
सभेचे प्रास्ताविक अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ.विलास काळे यांनी केले. माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी फडके साहेबांनी अरण केंद्रात सुरू असलेल्या सर्वेक्षण व जनजागृती संदर्भात करण्यात आलेल्या कामाचे कौतुक केले.तसेच कोरोना संदर्भातील लोकांमधील समज- गैरसमज दूर करावेत .हाय रिस्क,लो रिस्क व्यक्तींची माहिती घेऊन आरोग्य विभागास देण्याच्या सूचना शिक्षकांना करण्यात आल्या.गावातील दुकानादारांना कोव्हीड-१९ प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे.शिक्षकांनी वस्तूनिष्ठ, तत्परतेने व समन्वयाने काम केल्यास कोरोना रोखता येईल असे प्रतिपादन केले.
मोडनिंब रूग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. थोरात यांनी अरण हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असून सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवता येईल असे प्रतिपादन केले. कोरोना रोखण्यासाठी शिक्षकांनी सर्वे करून संबंधित व्यक्तींचे 100% टेस्टिंग करण्यासाठी प्रयत्न करावेत.प्रत्येक शिक्षकाने 20 लोकांच्या कोविशिल्ड लसीकरणाची जबाबदारी घ्यावी व लसीकरणासाठी नोंदणी करून घ्यावी.नोंदणी झाल्यानंतर अरण व तुळशी येथे लसीकरणासाठी विशेष कॅम्प लावण्यात येणार असल्याची माहिती दिली.
शिक्षकांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, होम आयसोलेशन, ट्रॅव्हल हिस्ट्री,होम क्वारंटाईन, हाय रिस्क लो रिस्क पर्सन संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले.परिसरातील दुकानदारांची दर 15 दिवसातून टेस्ट करण्याबाबत समज देण्यात यावी अशी सुचना केली.
लसीकरणाबाबत लोकांची भिती दूर करून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले. सदर सभेचे आभार प्रणित कापसे यांनी मानले.

एका शिक्षकाने 20 लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे- डॉ. शरद थोरात आरोग्य अधिकारी

Leave a Reply

Back to top button