Karamala

डॉ. इरफान इनामदार व श्री. चंद्रकांत नरळे ज्येष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर यांचे मार्गदर्शनाखाली केंद्र अरण ची ऑनलाइन- ऑफलाइन शिक्षणातून गुणवत्ता संवर्धन ऑनलाईन शैक्षणिक कार्यशाळा संपन्न.

डॉ. इरफान इनामदार व श्री. चंद्रकांत नरळे ज्येष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर यांचे मार्गदर्शनाखाली केंद्र अरण ची ऑनलाइन- ऑफलाइन शिक्षणातून गुणवत्ता संवर्धन ऑनलाईन शैक्षणिक कार्यशाळा संपन्न.

करमाळा : आज शनिवार दिनांक ६/३/२०२१ रोजी केंद्र अरण व कुर्डूवाडी बिट मधील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी ऑनलाइन – ऑफलाइन शिक्षणातून गुणवत्ता संवर्धन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर चे प्राचार्य मा. श्री. डॉ. इरफान इनामदार सर, अधिव्याख्याता नरळे सर, गटशिक्षणाधिकारी मारूती फडके, अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे, कुर्डूवाडी बीट व अरण केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक या गुगल मीट ऑनलाईन शिक्षण परिषदेसाठी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रस्ताविक केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे यांच्या प्रस्ताविकाने झाली. कोविड-१९ मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता- पायाभूत क्षमता निश्चित करून त्यांना उपचारात्मक अभ्यास पुरख मार्गदर्शनाची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. नरळे सर यांनी आजच्या शैक्षणिक कार्यशाळेचा जो विषय होता, ऑनलाइन- ऑफलाईन शिक्षणातून गुणवत्ता संवर्धन याबाबत त्यांनी गुणवत्तेचे विविध प्रकार सांगून बौद्धिक गुणवत्तेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी तपासण्यासाठी ज्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात रक्ताची तपासणी करून कमतरता असलेल्या घटकाची पूर्तता करण्यासाठी जो नियोजित कार्यक्रम तयार करतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करून उणिवा असलेल्या घटकांचा कृती कार्यक्रम तयार करावा व विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पती साध्य कराव्यात. तसेच पालकांना विश्वासात घ्यावे. मुलांच्या चांगल्या वाईट गोष्टी, होमवर्क, उपस्थिती याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच गुणवत्तावाढीसाठी अडसर असणा‍‍रे घटक विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती, गुणवत्ता कक्ष यांच्या समोर मांडून चर्चा करावी, मार्गदर्शन घ्यावे. माझ्या वर्गातील प्रत्येक मुलाची अध्ययन निष्पत्ती पूर्ण झाली पाहिजे या ध्येयाचा ध्यास लावून घेऊया व प्रत्येक मुल समजून घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊया.
मा. प्राचार्य डॉ.श्री. इनामदार यांनी आजच्या कार्यशाळे मध्ये गुणवत्ता संवर्धनासाठी शिक्षक व विद्यार्थी आंतरक्रिया अधिक समृद्ध केली पाहिजे, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी कोण कोणत्या पूरक बाबी पूर्ण कराव्या लागतात याकडे लक्ष द्यावे . शिकवत असलेल्या इयत्तेचा अभ्यासक्रम माहीत करून घ्यावा. तसेच वर्गाची एक वर्ग संस्कृती असावी याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षकांना शिक्षण प्रक्रियेत नित्यनियमाने होणारे बदल माहिती तंत्रज्ञान, वेगवेगळी साधने, दीक्षा ॲप, क्यूआर कोड ,व्हिडिओ, ऑडिओ त्याचा अध्यापनात वापर त्याची उद्दिष्टे व गुणवत्तेच्या दृष्टीने किती उपयोगाचे आहे हे पहावे. अध्ययन स्तर वाढवणे म्हणजे घोकंपट्टी नव्हे. विद्यार्थ्यांची विचार करण्याची प्रक्रिया समृद्ध करणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या चौफेर विकास करावा. असे मत मांडले. आजच्या या ऑनलाईन शैक्षणिक कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री. नवनाथ शिंदे यांनी केले तर आभार श्री. सोपान मोहिते यांनी मानले.

Leave a Reply

Back to top button