Nashik

भारतीय सैन्यदलात सामील झालेल्या तीन भूमिपुत्रांचे येवला शहरात जंगी स्वागत

भारतीय सैन्यदलात सामील झालेल्या तीन भूमिपुत्रांचे येवला शहरात जंगी स्वागत

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक==येवला तालुक्यातील चिंचोडी येथील ३ जवान भारतीय सैन्य दलात सामील होऊन एक वर्ष झाले आहे आज बाबासाहेब गुंजाळ रा. चिंचोडी यांची १४ महार बटालियन मध्ये तर समाधान आत्माराम झालटे यांची १५ महार बटालियन तर राहुल शांताराम भारस्कर यांची देखिल १५ महार बटालियन मध्ये निवड झाली या तिघांचीही जम्मू कश्मीर मध्ये पोस्टिंग झाली आहे या तिघांना ही एक वर्षी नंतर घरी परतल्याचा आनंद होताना दिसत होता त्यांनी प्रथमतःयेवला शहरातील विंचूर चौफुली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण केले त्यांचे स्वागत करताना फटाक्यांची अतिष बाजी केली चिंचोडी कर आणि येवले करानी त्यांचे जोरदारपणे स्वागत केले यांच्या स्वागतासाठी चिंचोडीचे सरपंच रवि गुंजाळ उपसरपंच नंदकुमार घोटेकर, समाधान मढवाई, सागर गुंजाळ (पोलिस), साईनाथ गुंजाळ, दत्तू माळी आदि ग्रामस्त व मित्र परिवार उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button