sawada

सरकारी यंत्रणा आहे मात्र अवैध कारभार करणाऱ्यांवर वचक नाही – सावद्यात पुन्हा उघडपणे बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा सुरू

सरकारी यंत्रणा आहे मात्र अवैध कारभार करणाऱ्यांवर वचक नाही – सावद्यात पुन्हा उघडपणे बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा सुरू

कोणतीच परवानगी न घेता समरी पावरमध्ये अवैध बायोडिझेल विक्रीचा काळाबाजार सुरू.

अवैध बायोडिझेल विक्रीतून केली जात आहे मोठी कमाई.

याप्रकरणी संबंधित यंत्रणेकडून केला जात आहे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

सावदा येथे रावेर रोडवरील अवैध बायोडिझेल पंप मालक विरुद्ध आतापर्यंत कारवाई न करण्यामागचे कारण काय?

सदरील प्रकार बाबत संबंधित स्थानिक यंत्रणाची भुमिका धृतराष्ट्र सारखी.

तरी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी जळगांव सह प्रांत अधिकारी फैजपूर याकडे लक्ष देणार कधी

युसूफ शाह सावदा

सावदा : सावदा जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे एक नव्हे दोन पंप टाकून कोणतीच सरकारी परवानगी नसताना सर्रासपणे कायद्याचा कोणताही धाक न बाळगता स्थानिक व तालुका यंत्रणेच्या नाकाखाली अवैध बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा चालविला जात होता. या धंद्यातून पंप मालकांनी मोठी कमाई करून ते रावेर तहसीलदार यांच्या कुचकामी भूमिकांमुळे अटक ऐवजी आजही मोकाट फिरत आहे.

सदरील बहुचर्चित अवैध बायोडिझेल विक्रीचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही सावदा येथील अवैध बायोडिझेल पंप मालकांनी मोठी आर्थिक कमाई सुद्धा केलेली आहे. तसेच या प्रकरणी पंप मालकांकडून संबंधित अधिकाऱ्यांची चांदीच चांदी झाल्याची चर्चा सुद्धा आता नागरिकांमध्ये होत आहे.

याबाबत फैजपूर रोडवर डायमंड ट्रान्सपोर्टच्या मागे भाड्याने घेतलेली जागेवर सुरू असलेले झुलेलाल बायोडिझेल पंपला फक्त नाम मात्र पंचनामा करून सावदा मंडळ अधिकारी संदीप जयस्वाल, पुरवठा निरीक्षक रावेर यांनी सील केले होते. व या पंप मालकवर उशिरा गुन्हा दाखल केला.

मात्र अद्याप पोलिसांकडून त्याला अटक झालेली दिसत नाही. तसेच २ महीन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून ही सावदा येथे रावेर रोड वरील न्यू महिंद्रा धाबा व कुंदन हॉटेल दरम्यान असलेले दुसरे अवैध बायोडिझेल पंप मालका विरुद्ध तालुका व स्थानिक यंत्रणेला पंचनामा करून सील करण्याची साधी कारवाई करता आली नाही.

यामुळेच की काय पुन्हा सदरील पंप मालकाने फक्त पूर्वी असलेल्या बायोडिझेल युनिट काढून येथे गुप्त नोजल पाईप द्वारे बायोडिझेल विक्रीचा काळाबाजार बिनदिक्कतपणे करण्यासाठी पुन्ह डोके वर काढलेले आहे.व कोणाच्या आशीर्वादाने तो उघडपणे सकाळ ते रात्री उशिरा पर्यंत हजारो लिटर अवैधरित्या बायोडिझेलची विक्री करीत आहे. तसेच सुरवातीपासून सदर पंप प्रकरणी रावेर तहसीलदारांची भूमिका संशयास्पद आहे. याबाबत फैजपूर प्रांताधिकारी यांची समक्ष भेट घेऊन मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदारांनी सुद्धा या आधी नाराजी व्यक्त केलेली असूनही याकडे जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी सह प्रांत अधिकारी सुद्धा लक्ष देत नसतील तर सरकारी यंत्रणा आहे. मात्र सदरील अवैध कारभार व काळाबाजार करणाऱ्यांवर त्यांचा वचक नाही. हे मात्र दिसून येते आहे. असे नागरिकाकडून बोलले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button