Amalner

बौद्धांनी अस्तित्वा साठी जागृत रहावे – सारिपूत्त गाढे

बौद्धांनी अस्तित्वा साठी जागृत रहावे – सारिपूत्त गाढे

बौद्धांनी अस्तित्वा साठी जागृत रहावे - सारिपूत्त गाढे
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे अमळनेर येथील फरशी रोड वरील बौद्ध विहारात जिल्हाअध्यक्ष
सारिपूत्त गाढे यांच्या उपस्थित बौद्ध बांधवाचे मार्गदर्शन शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जगात भारताची ओळख ही तथागत गौतम बुद्ध यांच्या नावाने आहे पण आजच्या घडीला बौद्ध धम्म हा आपल्या उदासीनते मुळे लयास गेला आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यावर धम्माचा प्रसार-प्रचार करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर आपण स्वार्थी झालो, यामुळे आपण बौद्धांची सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी कमी पडलो व विरोधकांनी याचा फायदा घेत सदर वारसा नष्ट करण्यात यशस्वी झाले व काही बौद्ध धार्मिक स्थळ कबज्यात घेतली, जगातील बौद्ध राष्ट्र भारताला तथागत गौतम बुद्ध यांच्या नावाने करोडो रुपये दान स्वरूपात देत असतात मात्र हे दान मूळ बौद्धांचे धार्मिक स्थळ किंवा विकासासाठी वापरतांना आढळत नाही, बौद्धगया येथील महाबौध्दि विहार याचे ज्वलंत उदाहरण आहे, आज ही या विहारावर हिंदू धर्मियांचा कब्जा आहे म्हणून बौद्धांनी संघटित व जागृत होणे काळाची गरज आहे, असे सांगून प्रबोधन केले.
कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध वंदनेणे झाली.
सदर संघटनेच्या दि 18 सप्टेंबरला शेगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय संमेलनाला आर्थिक मदत उपस्थित बौद्ध बांधवांनी दिले व संमेलनास बहुसंख्येने जाण्याचा संकल्प केला.
या वेळी अरुण पवार, आत्माराम अहिरे, गणेश ब्रम्हे, योगेश बिऱ्हाडे, आधार करंदीकर,गोकुळ करंदीकर,निबा मैराळे, अ ना घोलप सर, सत्तार खान,अमजद खान, भगवान संदानशीव, उमेश संदानशीव, प्रा विजय वाघमारे, इत्यादी सह अनेक बौद्ध बांधव उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विजय गाढे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button