Surgana

?️  डोळ्या देखत भात पिक वाया गेल्याने महिलेला अश्रू झाले अनावर..

?️ डोळ्या देखत भात पिक वाया गेल्याने महिलेला अश्रू झाले अनावर..वरसवाडी,भदर परिसराला एक तास मुसळधार पावसाने झोडपले सलग तिसऱ्या दिवशी पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान.पंचनामे करण्याची मागणी

विजय कानडे

सुरगाणा तालुक्यात नवरात्रिच्या पहिल्याच माळेपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सलग तिसऱ्यांदा विजांच्या कडकडाटासह तीन ते चार तास पाऊस पडल्याने आवणात पिकलेला ऊभा असलेला भात भुईसपाट झाला आहे. भाताच्या खाचरात गुडघाभर पाणी साचल्याने भात पुर्णपणे खराब झाला आहे. खाचरात पडलेला भात एक ते दोन दिवसात उगवून कोंब फुटतील. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे बळीराजाला पावसाने झोडपले अन राजाने फटकारले तर दाद मागायची कोणाकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आधीच कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिकट झाली असतांना पावसाने ऐनवेळी दगा फटका दिल्याने भविष्यात जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
परतीचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बरसल्याने पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पावसानेच दिले आणि पावसानेच ओरबाडून नेले असे म्हणण्याची वेळ आली आहे.पावसाच्या या तडाख्यामुळे भात, नागली,वरई,भुईमूग,सोयाबीन,खुरशनी हि पिके धोक्यात आली आहेत.तालुक्यातील,भदर, वरसवाडी, चिल्लारपाडा, प्रतापगड,मालगव्हाण, डोल्हारे , उंबरठाण,पळसन, बाऱ्हे, बोरगाव, खूंटविहिर, पिंपळसोंड, माणी,हट्टी आदी परिसरातील विविध प्रकारचा उभा भात आडवा झाला तर नागलीचे देखील नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणीवर आलेल्या भाताचे दाणे जोरदार वारा व पावसामुळे गळून पडल्याने तर काही ठिकाणी भातावर करपा व अळीचा रोग पडल्याने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसान झालेल्या ठिकाणी प्रशासनाने पीक पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button