Ahamdanagar

Shocking: न्याय मागण्यांसाठी आलेल्या तरुणीवर पोलीस उपनिरीक्षकानेच केला अत्याचार, कुंपनानेच शेत खाल्ले आता न्याय मागायचा कुणाकडे ?

न्याय मागण्यांसाठी आलेल्या तरुणीवर पोलीस उपनिरीक्षकानेच केला अत्याचार, कुंपनानेच शेत खाल्ले आता न्याय मागायचा कुणाकडे ?

अहमदनगर पोलीस खात्यात प्रचंड खळबळ!

सुनिल नजन/अहमदनगर, स्पेशल क्राईम रिपोर्टर

आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अंन्याय झाला तर आपण पोलिसांचे दार ठोठावतो,म्हणजे आपल्याला न्याय मिळेल ही अपेक्षा असते. पण पोलिसांनी च अंन्याय केला तर न्याय कुणाकडे मागायचा ही पिडीत व्यक्ती समोर मोठी शोकांतिका निर्माण होते. अशीच एक घटना राहुरी पोलीसांत घडली. दवणगाव ता.राहुरी जि.अहमदनगर येथील एक ओबीसी समाजातील (३०)वर्षीय पिडीत महिला जमीन खरेदी प्रकरणात प्रशांत बापुसाहेब चव्हाण रा.देवळाली प्रवरा ता. राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी फसवणूक केली म्हणून देवळाली प्रवरा येथील पोलीस चौकीत गेली होती.तेथील एकाने तीला 9325811987 हा मोबाईल नंबर देत राहुरी पोलीस स्टेशनला पाठविले.तो नंबर लावला असता संबंधीत साहेबांनी राहुरीतील आँफिसमधे येऊन भेटा असे सांगितले.राहुरीत आल्यावर पोलीस उपनिरीक्षक सजन्न नर्हडा(रजपूत)यांचा मोबाईल नंबर असल्याचे समजले. त्यांची भेट घेतली असता उपनिरीक्षक यांनी सांगितले की तुमचे काम करून दिले तर माझा काय फायदा, तर पिडीतेने कामाच्या बदल्यात पन्नास हजार रूपये देण्याचे कबुल केले.परंतु पोलीस उपनिरीक्षक यांनी पिडीतेकडे शरीर सुखाची मागणी करत मला काय पाहिजे हे तुम्हाला चांगले माहीत आहे असे सांगितले.जमीन खरेदीत फसवणूक झाल्या बाबदचा तक्रार अर्ज राहुरी पोलीस ठाण्यात देउन पिडीता आपल्या गावी निघून गेली. नंतर आठ दिवसांनी या पोलीस उपनिरीक्षकांनी पिडीतेला राहुरीला बोलावून घेतले आणि पिडीतेकडे असलेल्या मोबाईल नंबरवर”तू फार छान दिसतेस माझ्याशी मैत्री करशिल का?”असा मेसेज पाठवत तुला मला भेटायचे आहे असे सांगितले.ते शक्य नसल्याचे सांगत मग पिडीतेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे संबंधित पोलीस उपनिरीक्षक यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला.तरीही संबंधीत पोलीस उपनिरीक्षक पिडीतेला मोबाईल वर धमकावून म्हणाले की तु माझ्या कडे आली नाहीस तर मी तुझ्या घरी येउन तुझ्या मुलासमोर काहीपण करीन. अशी साहेबांनी धमकी दिली.दि.17/7/2023 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मी राहुरी तहसील कार्यालया समोरील चिंचेच्या झाडाखाली झेरॉक्स काढण्यासाठी उभी असताना तेथे संबंधित उपनिरीक्षक नर्हेडा साहेब आले व म्हणाले तुला आता माझ्या सोबत माझ्या रुमवर यावे लागेल. मी रुमवर येण्यास नकार दिला असता ते म्हणाले मग रात्री मी तुझ्या घरी येउन तुझ्या मुलासमोर काही पण करील अशी धमकी दिली.मी घाबरून गेले.मग मला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास माझ्या स्कुटी गाडीवर बसून राहुरी स्टेशन रोडवर असलेल्या सदर पोलीस उपनिरीक्षक रहात असलेल्या त्यांच्याच रुमवर मला
नेले.तेथे त्यांनी माझ्या वर जबरदस्तीने शरीर संबंध केलेले आहेत. दि.7/6/2023ते दि.17/7/2023 पर्यंत वेळोवेळी धमकी देत जबरदस्तीने रूमवर नेत शारीरिक संबंध केलेले आहेत.गुन्हा रजिस्टर नंबर 0789/2023 कलम 376(2) (अ),506 प्रमाणे अशा आशयाची फिर्याद पिडीतेने राहुरी पोलीस स्टेशनला उपनिरीक्षक सजन्न नर्हाडा यांच्या विरोधात दाखल केली आहे.अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक ओला साहेब या उपनिरीक्षका विरोधात काय कारवाई करतात याकडे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी ही या प्रकरणात लक्ष घालावे अशी पिडीतेच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे. याबाबत राहुरी तालुक्यात मात्र दबक्या आवाजात संबंधीत पोलीस उपनिरीक्षक यांनी खाजगी सावकारकी मोडीत काढून अनेकांना जेलची हवा खायला लावली होती म्हणून उपनिरीक्षक यांना धडा शिकवण्यासाठी हे प्रकरण तयार केले आहे अशीही कुजबुज ऐकू येत आहे.संपूर्ण पोलीस खात्याची बदनामी या प्रकारामुळे होत आहे. पिडीतेने अगोदरच जिल्हा पोलीस आधिक्षक यांची भेट घेत नंतर गुन्हा दाखल केला आहे म्हणून या प्रकरणाकडे संपूर्ण पोलीस खात्याचे लक्ष लागले आहे.(स्पेशल क्राईम रिपोर्टर,अहमदनगर जिल्हा)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button