Pandharpur

अखेर त्या वाळू प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने केली अटक 30 एप्रिल पर्यंत न्यायालयाने दिली पीसी

अखेर त्या वाळू प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने केली अटक 30 एप्रिल पर्यंत न्यायालयाने दिली पीसी

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरातून अवैधरित्या वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहनातून अवैधरित्या नेली जात असल्याची खबर पोलिसांना मिळताच त्यांनी येथील जुना कराड नाक्याच्या नजीक असलेल्या एका रुग्णालयासमोर दोन दिवसापूर्वी दोन टिप्पर व तलाठी सह सहा आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली होती. याप्रकरणी रिमांड मध्ये असलेल्या आरोपीला वाढीव रिमांड मागू नये यासाठी संबंधितांकडे लाच मागण्यात आली होती. चार लाख रुपये लाच मागितली होती दरम्यान दोन लाख रुपये देण्याचे ठरले त्यापैकी 70 हजार रुपये पहिला हप्ता देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस प्रशासनाची माझे संबंध आहेत असे म्हणणाऱ्या इसमाला पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आपल्या सहकार्‍यांसह तो पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र त्याने ही लाच कोणासाठी मागितली होती? तो अधिकारी कोण? याची परिसरात चर्चा होत होती. काल अखेर लाचलुचपत विभागाने पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे पीएसआय राजेंद्र गाडेकर यांना अटक केल्याची माहिती सूत्राकडून मिळाली पंढरपूर येथील जिल्हा न्यायाधीश कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स वरून त्यांना हजर केले असता न्यायालयाने 30 एप्रिल पर्यंत पोलीस रिमांड मंजूर केले आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गाडेकर हे गोरगरिबांना ताप देत होते! तर समोरचा कोण आहे हे पाहून वाळू व्यावसायिकावर कारवाई केली जात होती.! यासाठी त्यांनी खाजगी एजंट नेमले होते व त्या एजंटमार्फत हप्ता वसुली सुरू असल्याची चर्चाही होत होती. या प्रकरणांमध्ये काही पोलिस कर्मचारीही सामील आहेत असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु ते पोलिस कर्मचारी कोण? याबाबतही सध्या तर्कवितर्क लावले जात असून या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गाडेकर यांच्यावर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते हे कोणती कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असून पंढरपूर शहर पोलीसांकडे यापुढे तरी जिल्हा पोलीस प्रमुख गांभीर्याने पाहतील का? याठिकाणी चाललेल्या प्रकाराची शहानिशा करून खाजगी एजंटां कडून सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button