India

आरोग्याचा मुलमंत्र..हार्ट अटॅक ची लक्षणें व काळजी

आरोग्याचा मुलमंत्र..हार्ट अटॅक ची लक्षणें व काळजी

आजकाल हार्ट अटॅक मुळे मृत्युचं प्रमाण वाढलं आहे, इतकंच नव्हे तर कोरोनाग्रस्त रुग्णांमध्येही ह्रदयरोग असलेल्या रुग्णांना या विकाराचा धोका अधिक असल्याचंही सांगितलं जातं.
होतंय असं, की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं अनेकांना कठीण होत आहे.
कामाच्या ठिकाणी असलेले ताण, जबाबदाऱ्या आणि घरच्या आघाडीवर असलेल्या जबाबदाऱ्या यांचा मेळ घालणं कधी कठीण होऊन बसतं.

१) छातीत दुखणे किंवा कळ येणे

अटॅक येण्यापूर्वी माणसाला बऱ्याचदा चालताना छातीमध्ये जडपणा जाणवतो. जेव्हा चालत असतो अथवा काम करत असतो तेव्हा छाती जर सतत जड होत असेल तर त्याला एंजायना पेन असे म्हणतात. हृदयविकाराचा झटका येणार असेल तर हे अत्यंत कॉमन लक्षण आहे. अधिकतम केसमध्ये हे लक्षण दिसून आले आहे. त्यामुळे तुम्हाला जर वरचेवर छातीत जडपणा जाणवत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

२) श्वास घ्यायला त्रास होणे

अनेकदा अचानक श्वास घ्यायला त्रास होणे अथवा श्वास फुलण्याचा त्रास होऊ लागतो. साधारणतः तुम्हाला एक अथवा दोन मजले चढल्यानंतर कोणताही त्रास होत नसेल. पण आता जर अचानक त्रास होऊ लागला आणि श्वास चढू लागला तर तुम्ही वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे

३) डाव्या हातात कळ येणे किंवा चमक येणे

काही जणांना डावा आणि उजवा दोन्ही हातांमध्ये त्रास होतो. पण जास्त लक्षणे ही डाव्या हातामधून कळा येण्याची दिसून आली आहेत. साधारणतः कोणतेही काम करताना अथवा चालताना होणारा त्रास हा आराम केल्यानंतर निघून जातो. पण काही वेळा या त्रासाकडे थकवा अथवा कमजोरीच्या कारणाने त्रास होतोय असे समजून दुर्लक्षित करण्यात येते. तसेच सामान्यता डाव्या खांद्याचं दुखणं सुद्धा दिसून येत.

४) हृदयची धडधड वाढणे आणि घाम येणे

कोणत्याही कारणाशिवाय अचानक सतत घाम येणे, अर्थात कोणतेही शारीरिक श्रम न करताही तुम्हाला घाम येणे अथवा सतत गरम होणे किंवा अचानक घामाने भिजून जाणे आणि बऱ्याचदा हृदयाची स्पंदने अचानक वाढतात अथवा अचानक कमी होतात ही लक्षणेही हृदय विकार आहेत.

५) मळमळ होणे

हार्ट अटॅक च्या लक्षणणं मध्ये मळमळ होणे हे मुख्य लक्षण आहे. छातीत दुखणे त्याच सोबत मळमळ होणे हे ही प्रामुख्यानं निदर्शनास येते.

हार्ट अटॅक रोखण्यासाठी घ्यायची काळजी:

नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपली जीवनशैली योग्य राखून निरोगी राहण्यासाठी चांगले हेल्दी जेवावे. त्याचप्रमाणे सिगारेट, दारू यासारख्या व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे.

वरील लक्षणें काळजी पूर्वक बघा. यातील लक्षणें दिसून आल्यास रुग्णाला त्वरीत दवाखान्यात भरती करा. आणी डॉक्टरांच्या साल्यांने उपचार घ्या. शक्य तेवढं तेलकट पदार्थ खायचे टाळा. महत्वाचं म्हणजे व्यसनानं पासून दूर राहा.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{ होमिओपॅथिक तज्ञ }

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button