India

आरोग्याचा मुलमंत्र…राम फळा चे आरोग्यदाई फायदे

आरोग्याचा मुलमंत्र…राम फळा चे आरोग्यदाई फायदे

रामफळातील व्हिटॅमिन सी घटक, फ्री रॅडिकल्सशी सामना करण्याची क्षमता शुष्क केसांची समस्या, अ‍ॅक्ने मार्क्स आणि कमजोर सांध्यांना बळकटी देण्यासाठी मदत करतात. मधूमेहींसाठी रामफळ अक उत्तम उपाय आहे. रामफळाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी या फळाचे सेवन करावे.
दररोज आपण अनेक फळांचे सेवन करतो. मात्र, त्यातील काही फळे आहेत. ज्याचे रोज सेवन केले नाही. यामध्ये रामफळाचा देखील समावेश आहे. रामफळ हे आरोग्यदायी असले तरीही त्याचा आहारात फारसा वापर केला जात नाही. पण आरोग्याच्यादृष्टीने रामफळ अत्यंत गुणकारी असल्याने तुमच्या नजरेस पडल्यास हे फळ नक्की चाखा.

कमजोर रोगप्रतिकारशक्ती :-

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी रामफळ फायदेशीर ठरू शकते. रामफळातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी घटक फायदेशीर ठरतात.

नवमातांनकरता फायदेशीर :-

नवमातांनी रामफळाचे सेवन करावे. या फळामुळे त्यांना दूध चांगल्या प्रमाणात येते.

शुष्क केसांची समस्या :-

रामफळातील व्हिटॅमिन सी घटक, फ्री रॅडिकल्सशी सामना करण्याची क्षमता शुष्क केसांची समस्या, अ‍ॅक्ने मार्क्स आणि कमजोर सांध्यांना बळकटी देण्यासाठी मदत करतात.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथिक तज्ञ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button