India

आरोग्याचा मुलमंत्र..गुणकारी अक्रोड (Walnut)

आरोग्याचा मुलमंत्र..गुणकारी अक्रोड (Walnut)

अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.
अक्रोड हा अत्यंत पौष्टीक असा सुखमेवा असून यात हेल्दी फँट, प्रोटीन, मिनरल, आणि व्हिटॅमिन्स चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते.
मेंदूच्या आरोग्या साठी आणि स्मरण शक्ती साठी अक्रोड खाने कधीती उपयुक्त असते.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ, अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड, पॉलिफेनॉल्स असे उपयुक्त घटक असल्याने त्याच्या नियमित सेवनाने 28 टक्के पुरुषांच्या तणावग्रस्त आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सिद्ध झाले आहे.

१) अक्रोड लिव्हर संबंधित समस्या, थायरॉइड, सांधे दुखी तसेच पिंपल्स, डायबेटीज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं.

२) अक्रोड हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर दातांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं.

३) अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असतं. त्यामुळे याचं सेवन करणं हदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं.

४) अक्रोडमध्ये कॅन्सररोधी गुणधर्म असतात. त्यामध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट असतात, जे कॅन्सर वाढण्यापासून रोखतात. तसेच ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठीही अक्रोड लाभदायक ठरतं.

५) अक्रोडमध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन-ई आणि प्रोटीन आढळून येतं. याच्या नियमित सेवनाने केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते.

६) गरोदर महिलांसाठी अक्रोडचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. पोटातील बाळाला पोषण पुरविण्यासाठी अक्रोड मदत करतं.

७) अक्रोडच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि शरीराला आवश्यक एनर्जी मिळते.

८) तुम्ही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर अक्रोडचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं.

९) शरीरावर एखाद्या भागामध्ये आपल्याला वेदना, जळजळ होत असेल किंवा सुज आली असेल तर त्या ठिकाणी अक्रोडच्या सालाचा लेप लावा आराम मिळेल.

१०) अक्रोडची पाने चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात.

११) रोज अक्रोड खाल्याने शरीरावर होणाऱ्या सफेद डागांची समस्या दूर होते.

१२) डाएटमध्ये दररोज 5 अक्रोड आणि 15 ते 20 मनुक्यांचा समावेश केला तर अनिद्रेची समस्या दूर होते. अक्रोडमध्ये मेलाटोनिन आढळून येतं जे झोपेसाठी परिणामकारक ठरतं.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button