India

आरोग्याचा मूलमंत्र…घोरताय..!जाणून घ्या कारण आणि उपाय..!

घोरताय..!जाणून घ्या कारण आणि उपाय..!

सर्व साधारण माणसाला झोप ही जितकी प्यारी असते तितकीच ती आवश्यक देखील असते.दैनंदिन जीवनातील ताण जर थोडा फार कमी होत असेल तर तो झोपे मुळे.. म्हणूनच उत्तम झोप लागणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. पण घोरण्या मुळे अनेक समस्या निर्माण होतात. कारण घोरणे इतरांच्या झोपेचं खोबरं करतो. तर घोरणारी व्यक्ती चेष्टेचा विषय बनते. घोरणे हा प्रकार गमतीत घेतला जातो पण घोरणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. घोरणाऱ्या व्यक्तीचा ७५% लोकांना श्वास कोंडला जातो. याला शास्त्रीय भाषेत ‘obstructive sleep apnea’ म्हणतात. यामुळे हृदयाचे विकार होऊ शकतात.
घोरण्याचे अनेक वाईट परिणाम होतात.सर्वात प्रथम तर घोरण्याने वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो.याशिवाय घोरणाऱ्या व्यक्तीच्या एकूण दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. श्वास कोंडल्याने दचकून जाग येते, मग पुन्हा झोपेसाठी वेळ जातो. काहीवेळा झोपेतून अचानक जाग आल्यावर डोकेदुखीचा त्रास होतो. पुन्हा झोपायचं म्हटलं तर झोप लागत नाही.मग पुन्हा तेच चक्र सुरु राहतं. याचा परिणाम म्हणजे झोप पूर्ण होत नाही आणि चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे अशी लक्षणं दिसू लागतात.

घोरणे या समस्येवर काही उपाय..

1 उताणे झोपू नये
श्वसनक्रिया सुरळीत राहावी यासाठी उताणे झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपा. उताणे झोपल्याने होतं काय, की जीभ मागच्या बाजूला सरकते आणि श्वसनाच्या मार्गात अडथळे येतात. उताणे झोपलेल्या माणसाच्या तोंडून जो विचित्र आवाज येत असतो तो हवेचा मार्ग रोखल्याने निर्माण होतो.

2 मद्यपान करू नये

एकंदरीत आरोग्यासाठी मद्यपान हे वाईटच पण घोरण्याच्या बाबतीत म्हणाल तर घोरणाऱ्या व्यक्तीने मद्यपान हे टाळलच पाहिजे. याचं कारण असं, की झोपण्याच्या ३ ते ४ तास आधी मद्यपान केल्यास घश्यातले स्नायू शिथिल पडतात, त्यामुळे न घोरणारी व्यक्तीही घोरू लागते.

3 पूर्ण झोप आवश्यक

घोरण्याच्या अनेक कारणांमध्ये अपुरी झोप हे एक कारण आहे. ७ ते ८ तासांची झोप ही आरोग्यासाठी फायदेशीर असते. पुरेशी झोप मिळत असेल तर घोरणे कमी होते. याखेरीज झोपेची वेळ ठरवा. भरपूर काम करून तुम्ही जर उशिरा झोपत असाल तर तुम्हाला गाढ झोप लागते. इतकी गाढ झोप ही घोरण्याला निमंत्रणच असते.

4 वजन कमी करा.

स्लिम व्यक्तींनाही घोरण्याचा त्रास असतो, पण लठ्ठ व्यक्तींच्या बाबतीत हे प्रमाण जास्त आहे. गळ्याच्या भोवती जर मांस वाढलेलं असेल तर झोपेत घश्यावर दबाव निर्माण होतो. अशावेळी श्वास सुरळीत करण्यासाठी शरीराला जास्त प्रयत्न करावे लागतात. तर, वजन कमी करणे हा घोरण्यावरचा एक उत्तम उपाय असू शकतो.

5 नेजल स्ट्रीप किंवा नेजल डायलेटर

नेजल स्ट्रीप आणि नेजल डायलेटर हे दोन्ही श्वसनक्रिया सुरळीत करण्याचं काम करतात. घोरताना श्वास कोंडला जाऊ नये म्हणून हे दोन उपाय रामबाण ठरू शकतात.

6 भरपूर पाणी प्या

दिवसभरात पुरेसं पाणी प्यायल्याने घोरणे कमी होते. हे कसे ? त्याचं काय आहे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने नाकाच्या आतील भाग आणि घशातल्या टाळूचा भाग चिकट होतो. हा चिकटपणा अर्थातच श्वसनक्रियेत अडथळा आणतो. परिणामी घोरणे सुरु होते भाऊ. म्हणूनच पुरेसं पाणी प्या. फक्त घोरणे नाही तर इतर अनेक आजार कमी होतील.
चला तर मग हे उपाय करा आणि चांगली झोप घ्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button