India

आरोग्याचा मुलमंत्र..आरोग्यदाई हूरडा

आरोग्याचा मुलमंत्र..आरोग्यदाई हूरडा

आजकालच्या धावपळीच्या जगात खोट्या चवीसाठी पिझ्झा बर्गर खाऊन आपलं आरोग्य बिघडून घेणाऱ्या मंडळींना या रानमेव्याचा चविष्ट स्वादा बरोबर आहारातील महत्व पटने गरजेच आहे.ज्वारीत मोठ्या प्रमाणावर लोह असतं.
हुरडा, कोवळा लुसलुशीत, गुळभेंडीचा. खवय्यांची हौस भागवणारा. नातेसंबंधांचे आणि मैत्रीचे धागे अधिक दृढ करणारा. हा हुरडा म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी जीवनातला पर्यटनाचा अविभाज्य भाग आहे.

हुरडा हा शब्द सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही .

शहरात राहणाऱ्या लोकांना, तेही मराठवाड्याच्या बाहेर जे लोक असतात त्यांना हा शब्द नवीन आहे .

हुरड्यावर लिंबू पिळलं की, लिंबातील ‘क’ जीवनसत्त्वामुळे लोह सहजपणे शरीरात शोषलं जातं.
ज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे ती शक्तिवर्धक असते. ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याची क्षमता जास्त असते.

ही सर्व पोषक तत्त्वं आणि लोह मिळून शरीराचं चयापचय सुधारण्याचं काम करतात. गव्हाप्रमाणे ज्वारीत ग्लुटेन नसतं.
यात अँटी ऑक्सिडंट्स असल्याने त्याचा उपयोग हृदयविकार आणि कर्करोग होऊ नये म्हणूनही करता येतो.
हुरड्याप्रमाणे याच काळात गव्हाच्या ओंब्या भाजून ‘हुळा’ खाण्याचा तसेच ज्याला मराठवाड्यात ‘ढहाळे’ म्हणतात तो हरभरा भाजून खाल्यास या अन्नधान्यतून मिळणारे पौषक तत्व आरोग्यवर्धक ठरू शकतात.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button