Jalgaon

?जळगाव Live…बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बाबत राज्यमंत्री ना.बच्चूकडू यांचे जिल्हाधिकारी यांना दिले तात्काळ चौकशीचे आदेश

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बाबत राज्यमंत्री ना.बच्चूकडू यांचे जिल्हाधिकारी यांना दिले तात्काळ चौकशीचे आदेश

जळगांव : ना.बच्चूभाऊ कडू यांना दि.१९ फेब्रुवारी २०२१ पासून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगांव यांचे कडून मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग दाखले तयार होत असल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे ना.बच्चूकडू यांनी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे प्रतिनिधी योगेश पवार यांना या बाबत ईमेल ने पुरावे पाठवून आपण या बाबत सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी जळगांव यांना सविस्तरपणे या बाबत निदर्शनास आणून शासकीय चौकशीची मागणी करण्यात यावी असे सांगण्यात आले प्रहार संघटनेचे शिष्टमंडळाने दि.5 मार्च 2021 रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत चर्चा करण्यात आली होती. चौकशीचे इतिवृत्त प्रहार संघटनेस दिले असून बोगस दाखल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने जिल्हाधिकारी राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री.डॉ. जयप्रकाश रामानंद यांना लेखी आदेश देऊन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या कडून देण्यात आले आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे सावट असल्याने दिव्यांग दाखला देण्याचे काम बंद असून देखील ऑनलाईन दाखले 1 दिवसात तयार होत असल्याचे ना.बच्चूकडू यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे. या बाबतीत बैठकीस प्रहार संघटनेचे अध्यक्ष योगेश पवार, कायदेशीर सल्लागार ऍड. कविता पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी , कार्यकर्त्या प्रा.जयश्री साळुंखे आदी.च्या उपस्थित बैठक घेण्यात आली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button