Jalgaon

Jalgaon Live: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आज झाले शिक्षक.. विद्यार्थांना दिले गणित, इतिहास, राज्यशास्त्राचे धडे…

Jalgaon Live: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आज झाले शिक्षक..

जळगांव आसोदा येथील सर्वोदय एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विभागातील आजी-माजी शिक्षकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कार्यक्रमात हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. पण जिल्हाधिकारी यांनी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांना सोबत घेऊन वर्गाकडे अचानक मार्गक्रमण केले आणि शाळेतील दहावी ब च्या वर्गात जावून विद्यार्थ्यांना शिकविले.

आज शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा साठी गेलेल्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना गणित , इतिहास, राज्यशास्त्राचे चे प्रश्न विचारले .. एव्हढेच नव्हे तर आयुष प्रसाद यांनी खडू हातात घेतला आणि फळ्यावर
Concentration एकाग्रता, Enjoy आनंद, Dictionary शब्द संग्रह, Rivision सतत आवृत्ती, Mind Map आपल्या ज्ञानाचे उपयोजन करणे, Answer to the Question प्रश्नांची उकल मांडणी करीत आकलन करून उत्तराच्या समीप जाणे होय जिल्हाधिकारी अतिशय एकाग्रतेने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सहा सुत्री कार्यक्रम अंगी कारल्यास जीवनात सतत यशस्वी होणार आहात असेही त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना सांगितले प्रज्ञा कापडणे, दक्ष कोल्हे, हेमांगी पाटील, गायत्री चौधरी, हर्षल शिंपी, सादिया पिंजारी, तेजस्विनी ढाके यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब विचारलेल्या
प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शाळेत आपल्या भेटीचा आनंद शिक्षक दिनी मला महत्त्वाचा वाटतो असे देखील त्यांनी याप्रसंगी मांडले इयत्ता दहावीच्या वर्ग प्रतिनिधी तेजस्विनी ढाके, मिताली भारुळे यांनी मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी एजाज शेख यांचे वर्गात स्वागत केले याप्रसंगी संस्था अध्यक्ष विलासराव चौधरी, चेअरमन उद्धवराव पाटील सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल पर्यवेक्षक एल. जे. पाटील, शुभांगीनी महाजन, एस.के. राणेराजपूत, सचिन जंगले, मीनाक्षी कोल्हे व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित
होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button